Consume these 4 nuts daily to control blood sugar : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, आहाराची काळजी घेणे, शरीर सक्रिय ठेवणे व ताणतणाव नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार नियंत्रित करणे ही पहिली गोष्ट आहे. मधुमेहाच्या नियंत्रणासाठी आहारात प्रथिने आणि निरोगी चरबी यांचे सेवन करणे आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आहारात निरोगी चरबी आणि प्रथिने यांचे प्रमाण वाढवण्यािसाठी काही सुक्या मेव्यातील काही पदार्थांचा जादुई प्रभाव पडतो.

पौष्टिकतेने समृद्ध असलेले काजू हा असा पदार्थ आहे, जो खाल्ल्याने मधुमेहावर सहज नियंत्रण मिळवता येते. काजू खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. मधुमेह प्रशिक्षक व फिटनेस पोषण तज्ज्ञ अनुपम घोष म्हणाले की, जर मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या दैनंदिन आहारात काही काजू समाविष्ट केले, तर ते त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सहजपणे नियंत्रित करू शकतात.

सुका मेवा हा पोषक घटकांपैकी एक प्रमुख घटक आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, कॅल्शियम, तसेच असंतृप्त चरबी समृद्ध यांचा समावेश असतो. हे घटक मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात. मग रक्तातील साखर सामान्य करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत ते जाणून घेऊया.

काजू खा

काजूमध्ये मोनो-असंतृप्त चरबी असते, जी हृदयरोग रोखतात. त्यांचे सेवन केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. काजूमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे साखर नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. काजूमध्ये काही प्रमाणात फायबरदेखील असते, जे पचनक्रिया मंदावते आणि त्याचे सेवन मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

मूठभर काजू मधुमेह बरा करतात

बऱ्याचदा मधुमेहाचे रुग्ण काजू खाण्यास घाबरतात; पण तुम्हाला माहीत आहे का की, काजूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही.

अक्रोड खा

अक्रोड हे एक असे फळ आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि निरोगी चरबीने समृद्ध असलेले अक्रोड इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि जळजळ नियंत्रित करते. टाईप २ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी दररोज ४-५ अक्रोड खाणे खूप प्रभावी आहे. अक्रोड खाताना ते पाण्यात भिजवून खा.

पिस्ता खा

पिस्त्यामध्ये फायबर, निरोगी चरबी व अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तातील साखर सामान्य करण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात. ते इन्सुलिनचे काम चांगले करण्यास आणि पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. दररोज ६ ते ८ मीठ न घातलेले पिस्ते खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.

बदाम खा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सालीसह बदाम खावेत. बदामांमध्ये फायबर, प्रथिने व आरोग्यदायी चरबी असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्यापासून रोखली जाते. हे बादम खाल्ल्यानंतर साखरेच्या वाढीवर नियंत्रण राहते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. दररोज ५-६ भिजवलेले बदाम खाल्ल्याने साखर सामान्य राहते आणि हृदयाचे आरोग्यदेखील सुधारते. पाण्यात भिजवलेले बदाम खाणे सर्वांत जास्त फायदेशीर ठरते.