मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. मूत्राशयाचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे कारण ते रक्त शुद्ध करून शरीरातील विषारी तत्व बाहेर टाकते आणि इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यासाठी मदत करते. पण ज्या लोकांना मूत्राशयासंबंधी आजार आजार आहेत त्यांना आहारासंबंधी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण काही पदार्थ एकत्र खाल्याने मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. त्याबरोबर कित्येक आरोग्यसंमस्या निर्माण होऊ शकतात. एम्सच्या युरोलॉजिस्ट विभागाचे डॉ. परवेज यांनी जनसत्ताला महिती देताना सांगतात की, मूत्राशयासंबंधी आजार असलेल्या लोकांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मूत्राशयासंबंधी समस्या असलेल्या लोकांनी आहाराची अत्यंत काळजी घेतली पाहिजे कारण सर्व प्रकाराच आहाराचे सेवनामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. मूत्राशयासंबंधी आजार असलेल्या लोकांनी केळ आणि नारळ पाणी एकत्र खाणे हानिकारक ठरू शकते. सामान्यत: दूध आणि नारळ पाण्याचे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते आणि आहारात समाविष्ट केले जाते पण मूत्रपिंडाचे आजार असलेल्या लोकांसाठी पदार्थ एकत्र खाल्यास विषाप्रमाणे काम करू शकते.
डॉ. परवेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळ आणि नारळातील पोटॅशिअमची प्रमाण जास्त असते. अशा स्थितीमध्ये मूत्रपिंडाचे समस्या असलेल्या लोकांनी याचे सेवन करणे टाळावे. जेव्हा मुत्रपिंडाला जास्तीचे पोटॅशिअम बाहेर काढण्यासाठी ताण येतो तेव्हा हायपरकलेमिया होऊ शकतो ज्यामुळे स्नायू कमकूवत होतात, हृदयासंबधीत समस्या आणि थकवा जाणवू शकतो.
खरंतर, पोटॅशियम हे शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे, ज्याचा वापर शरीर स्नायूंचे आकुंचन, मज्जातंतूंचे कार्य आणि हृदयाची गती नियंत्रित ठेवण्यासाठी करते. सहसा मूत्रपिंड शरीरातून अनावश्यक गोष्टी फिल्टर करून पोटॅशियमची पातळी नियंत्रित करतात, परंतु ज्यांची मूत्रपिंडे आधीच कमकुवत किंवा खराब आहेत त्यांच्यासाठी ही प्रणाली बिघडते.
केळी आणि नारळ
केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे ३७५-४८७ मिलीग्राम पोटॅशियम असते. याशिवाय, नारळ, विशेषतः नारळ पाणी आणि नारळाचा लगदा, हायड्रेशन आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु नारळात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, अशा परिस्थितीत शरीरात पोटॅशियमचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे मूत्रपिंडांवर तसेच आरोग्यावर परिणाम होतो.
ते कसे टाळायचे
ज्या लोकांना दीर्घकालीन मूत्रपिंड रोग (CKD) इत्यादी समस्या आहेत त्यांनी केळी, एवोकॅडो, नारळ पाणी, संत्री, टोमॅटो, बटाटे आणि पालक यासारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ खाणे मर्यादित करावे किंवा टाळावे.