Natural Remedy for Uric Acid: हात, पाय, गुडघे किंवा बोटं दुखतायत? अंगात सतत जडपणा, सूज आणि शरीरात सुई टोचल्यासारखी वेदना जाणवतेय? मग सावधान हा केवळ थकवा नाही, तर शरीरात वाढणाऱ्या युरिक अ‍ॅसिडचे ते संकेत आहेत. आज लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत; पण चांगली गोष्ट म्हणजे उपाय आपल्या घरातच लपलेला आहे.

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

आपल्या शरीरात नैसर्गिकरीत्या काही टॉक्सिन्स (विषारी घटक) तयार होतात. हे टॉक्सिन्स आपल्या मूत्रपिंडाद्वारे फिल्टर होऊन युरीनमार्गे बाहेर टाकले जातात. पण जेव्हा मूत्रपिंड नीट कार्य करीत नाही, तेव्हा हे टॉक्सिन्स शरीरात साचतात आणि सांध्यांमध्ये क्रिस्टलच्या रूपात जमा होतात. हेच क्रिस्टल्स नंतर सांधेदुखी, सूज आणि हालचालींमध्ये त्रास निर्माण करतात.

आयुर्वेदानुसार, युरिक अ‍ॅसिड वाढण्यामागे जीवनशैली आणि आहार हे मोठं कारण असतं. अति प्रमाणात दारू आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेणं, फ्रुक्टोजयुक्त पदार्थ, जास्त मीठ, जड तेलकट जेवण, ब्लड प्रेशर, किडनी विकार, लठ्ठपणा, सोरायसिस किंवा इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधांचा अतिरेक हे सगळे घटक शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढवतात.

वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडची लक्षणं

  • हात, पाय किंवा गुडघ्यांमध्ये असह्य वेदना
  • सांधे सुजणे आणि लालसरपणा
  • चालताना टोचणे आणि ताण जाणवणे
  • पायाच्या अंगठ्यात सुया टोचल्यासारखा त्रास
  • थकवा, अंगदुखी आणि हालचालींमध्ये जडपणा

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पण, आयुर्वेद सांगतो, “नैसर्गिक उपचारांतच खरी शक्ती आहे.”

आयुर्वेद सांगतो – उपाय घरातच आहे!

बाजारातील औषधं आणि वेदनाशामक गोळ्या तात्पुरता आराम देतात; पण त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स दूर होत नाहीत. त्यामुळे वेदना परत परत उदभवतात. मात्र, आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण यांच्या मते, एक घरगुती उपाय असा आहे, जो केवळ युरिक अ‍ॅसिड नियंत्रितच करीत नाही, तर ऑर्थरायटिस आणि सांधेदुखीवरही जादूसारखा परिणाम करतो.

हा उपाय कोणता?

तो आपल्या प्रत्येक स्वयंपाकघरात असणारा धण्याचा दाणा (Coriander Seeds)!

धण्याचे दाणे कसे करतात चमत्कार?

धण्याच्या बियांमध्ये फायबर आणि लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. हे गुण शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढण्यात मदत करतात. धण्याचे बी युरिया आणि टॉक्सिन्स बाहेर टाकतं, त्यामुळे शरीरात जमा झालेलं युरिक अ‍ॅसिड हळूहळू कमी होतं. त्यांच्या नियमित सेवनानं सांध्यांमध्ये साचलेले क्रिस्टल्स वितळतात आणि युरीनमार्गे बाहेर पडतात. परिणामी सूज, वेदना आणि जडपणा कमी होतो.

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी धण्याचा उपयोग कसा करावा?

  • तव्यावर थोडं धन्याचं बी हलकं भाजा.
  • त्यात मेथी दाणे आणि ओवा समान प्रमाणात मिसळा.
  • हे सर्व एकत्र करून पावडर तयार करा.
  • रोज सकाळी आणि रात्री एक चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्या.

हा उपाय आमवात, सांधेदुखी आणि वाढलेलं युरिक अ‍ॅसिड या तिन्हीवर प्रभावी ठरतो. काही दिवसांतच याचा फरक जाणवतो.

धण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

  • मधासोबत धण्याच्या पावडरीचे सेवन केल्यास जुना खोकला दूर होतो.
  • मुखदुर्गंधी कमी करण्यासाठी रोज काही दाणे चघळा.
  • पचन सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचे विकार कमी करण्यासाठी हे बी अत्यंत लाभदायक आहे.

म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातला साधा धण्याचा दाणा हा केवळ मसाला नाही, तर आरोग्याचा अमूल्य खजिना आहे.
युरिक अ‍ॅसिड, सांधेदुखी व सूज या त्रासांनी कंटाळले असाल, तर औषधांच्या दुकानात नव्हे उपाय शोधा तुमच्या मसाल्याच्या डब्यात!