पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते.

तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आता ६० वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

(हे ही वाचा: Children Covid Vaccination: १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया)

लस नोंदणी प्रक्रिया

स्टेप १ – सर्व प्रथम Cowin App वर जा. तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.

स्टेप २ – आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.

स्टेप ३ – जर तुम्ही ६० वर्षाच्या पुढील असाल तर रजिस्ट्रेशन ऑप्शन निवडा.

स्टेप ४- जर तुम्ही ४५ वर्षांपेक्षा जास्त असाल आणि तुम्हाला काही व्याधी असतील तर ‘Do you have any co-morbidities’ हा पर्याय निवडा.

स्टेप ५- एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमचे सगळे तपशील दिसतील. तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

स्टेप ६ – मेंबर एॅड झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.

स्टेप ७ – आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.

स्टेप ६ – लसीकरणा नंतर तुमचं लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

स्टेप ७ – त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

(हे ही वाचा: ६० वर्षावरील नागरिकांना मिळणार बूस्टर डोस; व्याधी असणाऱ्यांना प्रमाणपत्र बंधनकारक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरा आणि प्री-कॉशन डोसमध्ये ९ महिन्यांचे अंतर आवश्यक

“बूस्टर डोससाठीची प्रक्रिया अगदी आधी सारखीच असेल. जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या दिवसातील अंतर ९ महिन्यांपेक्षा (३९ आठवडे) जास्त असेल तर तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र आहात,” अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली.