केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काहीजण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबुत करणे गरजेचे असते. कधीकधी शरीरातील काही विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केसगळती होऊ शकते. कोणते आहेत ते विटॅमिन आणि त्यासाठी कोणत्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा जाणून घ्या.
या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केसगळती
बायोटिन किंवा विटॅमिन बी७
- ‘विटॅमिन बी७’ला बायोटिन देखील म्हटले जाते. हे टाळू निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
- लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवणे हे बायोटिनचे वैशिष्ट्य आहे.
- या विटॅमिनच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरण कमी होण्याची आणि केसगळती होण्याची शक्यता असते.
- शरीरातील बायोटिनची कमतरता भरून काढण्यासाठी बदाम, मासे, मांस, सर्व प्रकारची धान्य अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा.
विटॅमिन डी
- विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडांबरोबर केसदेखील कमकुवत होतात.
- त्यामुळे ‘विटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे केसगळती होऊ शकते.
- सूर्यप्रकाश ‘विटॅमिन डी’चे उत्तम स्त्रोत मानले जाते. तसेच कॉड लिवर ऑइल, मशरूम, फॅटी फिश यांमध्ये देखील विटॅमिन डी आढळते.
विटॅमिन सी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- त्वचेसह केसांच्या उत्तम आरोग्यासाठी कोलेजन या प्रोटीनची गरज असते आणि विटामिन सी कोलेजनचे उत्तम स्त्रोत मानले जाते.
- शरीरात विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यास केसगळती आणि डँड्रफ ची समस्या उद्भवू शकते.
- तज्ञांच्या मते विटामिन सी ची कमतरता आढळल्यास ‘सेबोरहाइक डर्मेटाइटिस’ होऊ शकतो, यामध्ये डँड्रफची समस्या उद्भवते.
- यावर उपाय करण्यासाठी तुम्ही आंबट फळांचे सेवन करू शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)