Diabetic patients eat bananas? मधुमेहींनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. योग्य प्रमाणात न खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढते. केळी हे असेच एक फळ आहे, जे मधुमेहाचे रुग्ण अनेकदा खाण्यास घाबरतात. बहुतेक प्रकरणांमध्ये मधुमेह असलेल्या लोकांसाठी मर्यादित प्रमाणात केळी खाणे सुरक्षित मानले जाते. आता प्रश्न असा उद्भवतो की, मधुमेहाच्या रुग्णांनी केळी खावीत की नाही? मधुमेहात केळी खाणे सुरक्षित आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. जर हो, तर मधुमेह सामान्य ठेवण्यासाठी किती केळी खावीत? आपण सकाळी केळी खाऊ शकतो का ते जाणून घेऊया.
मधुमेही केळी खाऊ शकतात का?
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, मधुमेही व्यक्ती मर्यादित प्रमाणात केळी खाऊ शकतात. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (ADA) नुसार, मधुमेहाने ग्रस्त असलेले लोक केळ्याप्रमाणेच संतुलित प्रमाणात इतर फळेही खाऊ शकतात. साधारणपणे १०० ग्रॅम केळ्यामध्ये सुमारे २३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.
जर केळी मर्यादित प्रमाणात खाल्ली, तर त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे व फायबर मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेक फायदे मिळतात. केळ्यामध्ये विरघळणारे फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च असते. विरघळणारे फायबर पोटात जेलसारखे पदार्थ तयार करते, ज्यामुळे पचन मंदावते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. केळ्यामध्ये असलेले रेझिस्टंट स्टार्च हे एक कार्बोहायड्रेट आहे, जे हळूहळू पचते आणि रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ नियंत्रित ठेवण्यास मदत करते. केळ्यामधील विरघळणारे फायबर आणि रेझिस्टंन्स स्टार्च या घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
जर साखरेचे प्रमाण जास्त असेल, तर मी केळी खाऊ शकतो का?
मधुमेह तज्ज्ञ व वैद्यकीय डॉक्टर डॉ. अनुपम घोष यांनी सांगितले की, ज्या लोकांची भोजनापूर्वीच्या रक्तशर्करेचे प्रमाण उच्च १३३ एमजी/डीएल पेक्षा जास्त आहे, ते नाश्त्यात केळी खाऊ शकतात. तज्ज्ञांनी सांगितले की, ते स्वतः मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि त्यांच्या भोजनापूर्वीच्या रक्तशर्करेचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांनी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण पाहिले, ज्यामध्ये त्यांची उपाशीपोटीची साखर १३३ एमजी/डीएल होती आणि त्यांनी रिकाम्या पोटी चार केळी खाल्ली. केळी खाल्ल्यानंतर दोन तासांनी तज्ज्ञांनी साखरेची चाचणी केली असता, त्यांची साखर ११२ असल्याचे दिसून आले. तज्ज्ञांनी सांगितले की, चार केळी खाल्ल्यानंतर त्यांची साखरेची पातळी ११२ पर्यंत खाली आली. तज्ज्ञांनी सांगितले की, बहुतेक लोकांमध्ये केळी खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. कारण- केळीमध्ये ग्लुकोज नसून फ्रुक्टोज असते, ज्यामुळे शरीरात चयापचय होण्यास वेळ लागतो. जर तुम्ही दुपारी १२ वाजण्यापूर्वी केळी खाल्ली, तर तुमची रक्तातील साखर सामान्य होईल. ज्या लोकांची उपाशीपोटीची रक्तशर्करा खूप जास्त प्रमाणात आहे, त्यांनी काहीही सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.