-सुनील खोसला

भारत असाही डिजिटल अर्थव्यवस्थेच्या बदलाच्या उंबरठ्यावर होता आणि त्यात जागतिक महासंकटामुळे, ग्राहक आणि रीटेलर्स अशा दोन्ही बाजूंनी डिजिटल पेमेंट्सचा अंगिकार करण्याला अधिक चालना मिळाली. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2018-2020 मध्ये डिजिटल पेमेंट्सचे प्रमाण तब्बल 135 टक्क्यांनी वाढले. इतकेच नाही, रेडसीअर कन्सल्टिंगच्या अहवालानुसार आर्थिक समावेशकता आणि व्यापाऱ्यांचे वाढते डिजिटायझेशन यामुळे 2015 पर्यंत भारतात डिजिटल पेमेंटच्या व्यवहारांत तीनपटींहून अधिक वाढ होत हा आकडा 7092 लाखांपर्यंत जाईल. त्यामुळे, डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेतून एमएसएमईजसाठी प्रचंड संधी निर्माण होत आहेत.

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
How does fraud on name of investment happen
विश्लेषण : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक कशी होते? व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, टेलिग्राम संदेशांपासून सावध कसे राहावे?
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे

एमएसएमईजना डिजिटल पेमेंट्सचा फायदा कशाप्रकारे होतो?

1. सोयीस्कर आणि सुरक्षित पेमेंट पद्धती : डिजिटल पेमेंट्समुळे व्यवहार अधिक वेगवान, अधिक पारदर्शक होतील याची खात्री मिळते आणि अचूक सुट्टे पैसे बाळगण्यचा त्रासही नसतो. डिजिटल माध्यमांमध्ये व्यवहार करत असताना बटण क्लिक करून किंवा कार्ड स्वाइप करून पेमेंट केले जाते. त्यामुळे, यात सोय असते. असे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळतो कारण ते अगदी सहज आणि चटकन पेमेंट करू शकतात.रीटेलर्सच्या दृष्टिकोनातून पहायचे झाले तर, डिजिटल पेमेंट्समुळे अनेक प्रक्रिया सुयोग्य जुळून येतात. डिजिटल पेमेंटमुळे चोरीची भीती उरत नाही, व्यवहारात गैरप्रकार होत नाही, बँकेत फेऱ्या माराव्या लागत नाहीत इ. कारण, सगळे व्यवहार प्रत्यक्ष वेळेत, आपल्यासमोर पारदर्शकपणे होत असतात.

2. स्पर्धात्मक फायदा : व्यापारी डिजिटल पेमेंट पर्याय पुरवणाऱ्या आघाडीच्या इंडिया ट्रान्झॅक्ट लिमिटेडने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार 57 टक्के भारतीय ग्राहक आठवड्यातून 5-6 वेळा डिजिटल पेमेंट्स वापरतात. याचाच अर्थ डिजिटल पेमेंट्सचा पर्याय देणाऱ्या कोणत्याही रीटेलर किंवा सेवा प्रदात्याला बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळतो.डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची सेवा पुरवून नव्या देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठांमधील व्यवसाय आकर्षिक करण्यात डिजिटल पेमेंटचे कंपन्यांना साह्य लाभते. अनेक छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी डिजिटल पेमेंट्समुळे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी उपलब्ध होते. सध्याच्या ग्लोबलाइज्ड जगात व्यवसायाच्या यशासाठी व्यापक अस्तित्व आवश्यक आहे.

3. विकसित प्रक्रिया परिणामकारकता : व्यवहार डिजिटली झाला की कमावलेला, खर्च केलेला एक-एक रुपया हिशोबात दिसतो. सर्व डिजिटल व्यवहार आपोआप अकाऊंटिंग सॉफ्टवेअरमध्ये आणता येतात. त्यामुळे, व्यवसायाला लक्षणीय साह्य लाभते. डिजिटल व्यवहार करणाऱ्या एमएसएमईना अशा नियंत्रणामुळे साह्य होते. त्यामुळे व्यवस्थापन, आखणी, भविष्याच्या योजना सहज आखता येतात. अशा कंपन्यांना व्यवसायात अधिक पारदर्शकता लाभते.शिवाय, हे व्यवहार कायम नोंदवले जात असल्याने क्रेडिट स्कोअरही सुधारतो. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास आवश्यक तेव्हा कर्ज घेणे कंपन्यांसाठी सुलभ होते. आजघडीला चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या असंख्य एमएसएमईज त्यांच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करत आहेत.एमएसएमईज डिजिटल व्यवहारांचा अवलंब करत आपल्या व्यवसायातील अनेक अंगांना अधिक परिणामकारक बनवत आहेत. अनेक पेमेंट कंपन्या एकात्मिक पेमेंट व्यासपीठ देऊ करतात. ज्यामुळे डेटा अॅनालिटिक्सचा लाभ घेण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यासपीठांसह एमएसएमईजना एकात्मिक सुयोग्य रितीने तयार केलेल्या ईआरपी सुट्सचा लाभ मिळतो. डिजिटल पेमेंट सिस्टमला ईआरपी सॉफ्टवेअरची जोड दिल्याने त्यांना व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळून आपली लक्ष्ये गाठणे सोपे होते. इतकेच नाही, ही व्यासपीठे एमएसएमईजना उत्कृष्ट सुरक्षा आणि सुरक्षितता देऊ करतात.

4. ग्राहकांसाठी मूल्यवर्धन : हल्लीच्या जगात रीटेल हे फक्त पेमेंटपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ऑनगोसारख्या काही डिजिटल पेमेंट्स कंपन्या अनोखे लॉयल्टी प्रोग्राम जसे की अॅप/कार्ड आधारित, बिलिंग आणि अकाऊंटिंग सॉफ्टवेअर, वर्किंग कॅपिटल लोन इ. देऊ करतात. प्रथम आणि द्वितीय श्रेणी शहरांमध्ये लॉयल्टी पर्याय अगदी सर्रास म्हणजे नाविन्य वाटू नये इतके वापरले जातात.एमएसएमईना त्यांच्या सर्व गरजांसाठी एकथांबी पर्याय हवा असतो. पेमेंट, लॉयल्टी, बिलिंग, अकाऊंटिंगसाठी विविध वेंडर्ससोबत त्यांना व्यवहार करावे लागतात आणि हे त्रासाचे असू शकते. ऑनगोसारखे काही ब्रँड्स सर्व व्यावहारिक गरजांसाठी खास डिजिटल पर्याय पुरवतात.या मूल्यवर्धन सेवांमुळे महसूल निर्मिती, ग्राहकांशी जोडले जाणे आणि ब्रँडची दृश्यात्मकता यात नवे मार्ग व्यापाऱ्यांसाठी खुले होतात. इन्स्टंट मोटार इन्शुरन्स ही अशीच एक मूल्यवर्धन सेवा आहे. डिजिटल पेमेंटसोबत येणाऱ्या या सेवेमुळे व्यापाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळते आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढते.

5. गैरव्यवहार रोखणे : सर्व व्यवहार सुरक्षित व्यासपीठावर डिजिटली केले जातात त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी होते. गैरव्यवहार झाल्यास चुकीचा व्यवहार सहज शोधता येतो. संपर्करहित पेमेंटमुळे मधले व्यवहार कमी होऊन रक्कम सुरक्षितपणे मोबाइल वॉलेट किंवा बँकेच्या खात्यात जमा होते. यात सुरक्षितपणे व्यवहार होतात.पुढील वाटचाल सप्टेंबर 2019 मध्ये एनपीसीआयने मांडलेल्या प्रस्तावानुसार, यूपीआयवर क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार करणाऱ्या ग्राहक आणि कंपन्यांना या वर्षी कर लाभ दिले जातील. डिजिटल पेमेंटचा अंगिकार केल्यास कर सवलत मिळणे यामुळे भारतात एसएमई आणि एमएसएमईजना चालना देण्यात मोठा हातभार लागेल. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी इतरही मार्गांचा अवलंब केला जात आहे. 1 ऑक्टोबर 2019 पासून स्कॅन अॅण्ड पे ही सेवा उपलब्ध झाली. अनेक एमएसएमईजना त्याचा लाभ होत आहे.इतकेच नाही, देशभरात वाढत असलेल्या डिजिटल अंगिकारामुळे ग्रामीण भागातील अनेक नव्या उद्योजकांना शहरी भागातील उद्योजकांशी व्यवहार करणे सोयीचे झाले आहे. डिजिटल पेमेंट्समुळे पेमेंटची चक्रे कमी झालीच पण त्याचबरोबर भौगोलिक मर्यादा पुसट झाल्याने उद्योगक्षेत्र ‘फिजिटल’ झाले.राष्ट्रीय पातळीवरील व्यापक डिजिटल सेवा सातत्याने अधिक बळकट होत आहेत. या सेवा वापरणाऱ्या एमएसएमईजनाही त्यामुळे प्रचंड फायदा होत आहे. डिजिटल बदलांच्या माध्यमातून या प्रक्रियांमध्ये सुव्यवस्था येत आहे, नव्या बाजारपेठा उपलब्ध होत आहेत, क्रेडिट स्कोअर सुधारतोय, मिळकत सुरक्षित होतेय आणि आयटीआर भरण्यात चुका होण्याची भीतीही कमी झाली. शिवाय मूल्यवर्धित सेवा देऊ करत आणि डिजिटल व्यवहारांना संपूर्ण प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी लाभांचा अंगिकार केला जात आहे.

 

( लेखक-सुनील खोसला, अध्यक्ष – डिजिटल व्यवसाय, इंडिया ट्रान्झॅक्ट सर्व्हिसेस लिमिटेड)