Diwali 2025: दिवाळीचा सण आता तोंडावर आला आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक घरात देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. यावर्षी दिवाळी २० ऑक्टोबर सोमवारी दिवाळी साजरी केली जाईल. पण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मीसोबत गणपतीची पूजा का बरं केली जात असेल हा विचार तुम्ही केलाय का? तर यामागे काही पौराणिक कारणं आहेत ती जाणून घेऊ…
अनेक महाकाव्यांनुसार, श्री गणेश हे देवी लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत. कथेनुसार, देवी लक्ष्मीला स्व:चा खूप अभिमान वाटला. लक्ष्मीला असे वाटलं की, जगातील प्रत्येकजण केवळ तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची पूजा करतात आणि म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ आहे. लक्ष्मीची ही भावना पाहून विष्णू हसले आणि म्हणाले, “देवी, तू खरोखरच पूजनीय आहेस, पण तुझ्यात एक दोष नाही. तुझ्याकडे प्रचंड संपत्ती आणि समृद्धी आहे, मात्र मातृत्वाचा आनंद नाही. म्हणूनच तुला मुलाच्या प्रेमाची आस आहे.”
भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून लक्ष्मीचा अभिमान डगमगला. दु:खी होऊन ती देवी पार्वतीकडे आपले विचार व्यक्त करण्यासाठी गेली. गणेश आणि कार्तिकेय यांची आई देवी पार्वती लक्ष्मीचे म्हणणे ऐकून घेत होती. मग प्रेमाने तिचा मुलगा गणेश याला जवळ घेत देवी लक्ष्मी म्हणाली, “आतापासून गणेश तुझा पुत्र असेल. त्याला तुझा स्वत:चा पुत्र समज आणि मातृत्वाचा आनंद अनुभव.”
गणेशाला आपल्या मांडीवर घेऊन देवी लक्ष्मीते ह्रदय आनंदाने भरून गेले. तिला असे वाटले की, तिचे जीवन पूर्ण झाले आहे. मातृत्वाचा आनंद अनुभवल्यानंतर तिने गणेशाला एक सुंदर वरदान दिले. “आजपासून जिथे जिथे माझी पूजा केली जाईस, तिथे तिथे प्रथम तुझी पूजा केली जाईल. तुझ्याशिवाय कोणीही माझी पूजा केली तर मी तिथे राहणार नाही.” म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यक्रमाची सुरूवात गणेशाच्या पूजेपासून होते. दिवाळीच्या रात्री जेव्हा लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात, तेव्हा ते प्रथम गणेशाची प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेतात, जेणेकरून त्यांचे घर समृद्धी, ज्ञान आणि समाधानाने भरभरून जाईल.
दिवाळी लक्ष्मी-गणेश पूजनाचा मुहूर्त
२० ऑक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीचा लक्ष्मी-गणेश पूजेसाठी सर्वात शुभ वेळ संध्याकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल. हा काळ प्रदोष काळ आणि स्थिर लग्नाचा संयोजन मानला जातो. जो देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.