Cleaning Tips: दिवाळी हा फक्त दिवे आणि गोड पदार्थांचा उत्सव नाही, तर तो स्वच्छता आणि नवीन सुरुवातीचाही सण आहे. प्रत्येक घरात दिवाळीपूर्वी साफसफाईला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामागे नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छ आणि सुगंधी वातावरणात व्हावी, अशी इच्छा असते. मात्र, किचनमधील तेलाचा मेणचट थर, आणि कित्येक महिन्यांपासून जमा झालेली धूळ साफ करणे अनेकांसाठी मोठे आव्हान असते. परंतु, त्यासाठी महागडी रसायने वापरण्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब केल्यास खूप चांगल्या रीतीने साफसफाई होते आणि किचनमधील सामान सुरक्षित राहते. येथे खाली आम्ही तुम्हाला ५ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय देत आहोत, जे तुमच्या स्वयंपाकघराला चकचकीत बनवतील.
१. साखर आणि बेकिंग सोडा
गॅस स्टोव्ह, चिमणी, टाइल्स व स्लॅब स्वच्छ करण्यासाठी साखर आणि बेकिंग सोडा खूप उपयुक्त आहेत. एका भांड्यात पांढरी साखर आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात मिसळा. या मिश्रणाने एक प्रकारचा फेस तयार होईल. त्या फेसात बुडवलेला स्पंज किंवा ब्रश चिकट पृष्ठभागावर फिरवा आणि १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर तो भाग स्वच्छ पाण्याच्या कपड्याने पुसून टाका.
२. लिंबू आणि मीठ
कटिंग बोर्ड, सिंक किंवा नळ यांसारख्या धातूच्या पृष्ठभागावर जमा झालेली चिकट घाण साफ करण्यासाठी लिंबू आणि मीठ अत्यंत फायदेशीर ठरते. लिंबू कापून, त्यावर थोडे मीठ पसरवा आणि मग ते थेट धुळीचा चिकट थर किंवा धूळ असलेल्या भागावर रगडा. सायट्रिक आम्ल आणि मिठाच्या घर्षणाच्या मिश्रणामुळे घाण सहज निघून जाईल.
३. गरम पाणी आणि डिश लिक्विड
जर स्वयंपाकघरातील स्लॅबवर जुनी घाण असेल, तर गरम पाण्यामुळे धुळीचा चिकट थर सैल होईल आणि डिश लिक्विडमुळे तो स्वच्छ करणे सोपे होईल. एक बादलीत गरम पाणी घ्या आणि त्यात डिश वॉशिंग लिक्विड टाका. एक मायक्रोफायबर कापड भिजवा आणि गॅस, कपाट स्वच्छ करा.
४. मैदा किंवा कॉर्न स्टार्च
जर चिमणी किंवा कपाटावर तेलकट जाड थर असेल, तर त्यावर कॉर्न स्टार्च किंवा पीठ पसरवा आणि काही मिनिटांनी ते कापडाने पुसून टाका. नंतर साखर-व्हिनेगर फवारून चांगले स्वच्छ करा.
५. बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड
दोन चमचे बेकिंग सोडा आणि काही थेंब हायड्रोजन पॅरॉक्साइड मिसळा. हलके स्क्रब तयार होईल, जे ओव्हन किंवा जिद्दी डाग साफ करण्यास मदत करील.