Diwali Rangoli Ideas: दिवाळी आली की रांगोळ्यांची लगबग सुरु होते. यंदा काहीतरी भन्नाट करायचं असं प्रत्येकीनेच ठरवलेलं असतं पण ऐन वेळेला काय करावं हे सुचत नाही. मग तेच नेहमीचे छाप किंवा पाच ठिपक्यांच्या रांगोळ्यांचे पर्याय समोर येतात. पण मैत्रिणींनो यंदा एक आठवडा आधीच आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला हवी तशी भन्नाट कल्पना घेऊन आली आहे. रांगोळी काढायची म्हणजे बाजूच्या मस्तीखोर मुलांपासून ते पावसापर्यंत सगळ्या बाजूने रक्षण करावं लागतं. पण यंदा आपण अशी रांगोळी काढू शकता की जिला पाय फिरवून पुसून टाकता येणार नाही आणि पाऊसही तिचं काही बिघडवू शकणार नाही. मैत्रिणींनो यंदा आपण चक्क पाण्यावरची रांगोळी काढून पाहुयात…

तुम्ही नक्कीच आतापर्यंत या संकल्पनेबाबत ऐकून असाल पण पाण्यावर रांगोळी काढायची कशी? युट्युबचे लांबच लांब व्हिडीओ बघत वेळ घालवत बसू नका उलट आज आपण एक मिनिटाच्या या व्हिडिओमधून सोपी पण कमाल रांगोळी पाहणार आहोत… चला तर मग..

पाण्यावर रांगोळीसाठी या गोष्टी हव्यात:

१) पाणी (अर्थात)
२) खोबरेल तेल (पाम तेल सुद्धा चालेल)
३) आवडीच्या रंगाची रांगोळी
४) फुलं व दिवे (सजावटीसाठी)
५) परात किंवा मोठं ताट

अशी काढा पाण्यावरची रांगोळी

Diwali 2022: दिवाळीचे अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज सर्व मुख्य तिथी, शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही पण येत्या दिवाळीसाठी असे भन्नाट प्रयोग करून त्याचे फोटो आमच्यासह शेअर करायला विसरू नका. यासाठी लोकसत्ता पेजवरील लोकउत्सव कॅटेगरी नक्की तपासून पाहा. तसेच अशाच नवनवीन टिप्ससाठी लोकसत्ताला फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.