Natural Home Remedies For Dark Neck : सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअप पुरेसा नाही, तर शरीराच्या सर्व अवयवांच्या स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घ्यावी लागते. यात उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने स्किन टॅनिंगची समस्या वाढते. उन्हाच्या तीव्र झळा, त्यात घाम आणि धुळीमुळे पाठ, मान खूप काळपट दिसू लागते; जी पाहतानाही खूप घाण वाटते. यावर बाजारात अनेक क्रिम्स उपलब्ध आहेत, पण त्याचा हवा तसा परिणाम जाणवत नाही. यात पार्लरमध्ये जावं तर हजारो रुपये खर्च होतात, त्यामुळे मान आणि पाठीवरील काळपटपणा दूर करण्यासठी तुम्ही घरच्या घरी क्लिन्सर बनवून त्याचा वापर करू शकता. हे क्लिन्सर तुम्ही रोज अंघोळ करण्यापूर्वी वापरल्यास काही दिवसांत मान आणि पाठीवरील त्वचा उजळ दिसेल.

मान आणि पाठीवरील त्वचा उजळ करण्यासाठी घरगुती उपाय

बॉडी वॉश
कॉफी पावडर
इनो
टूथपेस्ट

टूथपेस्टपासून बनवा क्लिन्सर

टूथपेस्टपासून क्लिन्सर बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात थोडेसे बॉडी वॉश घ्या. त्यानंतर त्यात कॉफी पावडर घाला. नंतर त्यात इनो आणि शेवटी टूथपेस्ट मिक्स करा. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी क्लिन्सर तयार करून वापरल्यास आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसेल.

अशाप्रकारे करा क्लिन्सरचा वापर

प्रथम मान आणि पाठ स्वच्छ करा, यानंतर त्यावर घरी बनवलेले क्लिन्सर लावा. सुमारे १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सुती कपड्याने मान आणि काळी पाठ हलकी स्क्रब करा, त्यानंतर साध्या पाण्याने अंघोळ करा. हे लावल्याने मान आणि पाठीवरील काळपटपणा तर दूर होईलच, शिवाय मान आणि पाठीवरील बारीक छिद्रांमध्ये जमा झालेली घाणही स्वच्छ होईल.

आठवड्यातून किती वेळा वापरायचं?

तुम्ही आठवड्यातून दोनदा हे घरगुती क्लिन्सर वापरू शकता आणि पूर्णपणे स्क्रब करून तुमची त्वचा स्वच्छ करू शकता.

बेसनचा उपाय

बेसनाच्या साहाय्यानेही तुम्ही मान आणि पाठीवरील टॅनिंगपासून आराम मिळवू शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, हळद, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून पेस्ट तयार करा. यानंतर ती मान आणि पाठीवर लावा. सुमारे २० मिनिटे हे तसेच ठेवा, नंतर कोमट पाण्याने मान आणि पाठ स्वच्छ धुवा.