घरात आरोग्यदायी वातावरण असले तर घरातील लोकही अनेक आजारांपासून दूर राहतात. पण यासाठी वेळोवेळी घरात स्वच्छता राखणे फार गरजेचे असते. विशेषत: घरातील फरशी, बाथरुम टाईल्स, टॉयलेट स्वच्छ ठेवणे महत्वाचे असते. आपण या सर्व गोष्टींच्या स्वच्छतेसाठी बाजारातून विविध प्रकारचे लिक्विट किंवा फ्लोअर क्लिनर विकत आणतो. पण हे महागडे फ्लोअर क्लिनर वापरल्यानंतर काही दिवसांत संपून जातात. इतकेच नाही तर त्या फ्लोअर क्लिनरमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतात जे न केवळ तुमच्या फ्लोअरचेच नुकसान करतात तर तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीही हानिकारक असतात. अशापरिस्थितीत आम्ही तुम्हाला अगदी २० रुपयांत घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने फ्लोअर क्लिनर कसे तयार करायचे याविषयी सांगणार आहोत. हे फ्लोअर क्लिनर तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरणार नाहीत.

मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी फ्लोअर क्लिनर बनवण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत.

संत्र्याच्या सालीपासून तयार करा फ्लोअर क्लिनर

२०० – ३०० ग्रॅम संत्र्याची साल
८० – १०० ग्रॅम गूळ
१ लिटर पाणी

तयार करण्याची पद्धत:

ऑर्गेनिक फ्लोअर क्लीनर बनवण्यासाठी सर्वप्रथम संत्र्याची साल आणि गूळ घ्या. आता ते एक लिटर पाण्यात मिसळा आणि हवाबंद डब्यात बंद करून ठेवा. पण लक्षात ठेवा की, डब्याचे झाकण दररोज काही काळ उघडे ठेवावे लागेल. जेणेकरून त्यात तयार झालेला गॅस बाहेर येऊ शकेल. अशाप्रकारे तीन महिन्यात तुमचे नैसर्गिक फ्लोअर क्लिनर वापरण्यासाठी तयार होईल.

कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

कापूर, तुरटीपासून तयार करा फ्लोअर क्लिनर

१२ तुकडे कापूर
मध्यम आकाराची तुरटी
१ दालचिनी
२-३ चमचे मीठ
६-७ थेंब असेंशियल ऑयल

तयार करण्याची पद्धत –

वरील सर्व गोष्टींची बारीक पेस्ट करुन एक लिटर पाण्यात मिसळा. यात तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही असेंशियल ऑयल मिक्स करु शकता. अशाप्रकारे तुमचे होममेड फ्लोअर क्लीनिंग तयार आहे. कापूरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे लादीवर असलेले कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया लवकर मरतात आणि घरात सुगंधित आणि स्वच्छ वातावरण राहते.