मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु, केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथी दाण्यांचे सेवन केले जाते. मेथी शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. मेथीचे दाणे आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहेत. मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी च्या पोषक तत्वाने मेथी दाण्याचे पाणी भरलेले आहे. पण, तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? याच विषयावर जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ पी. एस. सुषमा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
जर तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमचे आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकते. मेथीचे दाणे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायद्याचे ठरतात. मेथीमध्ये विरघळणारे फायबरदेखील असते जे कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले आहे. याव्यतिरिक्त मेथी आतड्यांमधील कोलेस्ट्राॅलचे शोषण रोखण्यास मदत करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
(हे ही वाचा : सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?)
मेथीच्या बियांचे सेवन कसे करावे?
- एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
मेथीच्या अनेक आरोग्यदायी फायद्यांमुळे १४ दिवस ते खाल्ल्याने शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. ते फायबर, प्रथिने, लोह आणि इतर महत्त्वपूर्ण घटकांनी समृद्ध आहेत. पचनास मदत करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, वजन कमी करण्यास प्रोत्साहन देणे आणि कोलेस्ट्राॅल कमी करणे यासाठी त्यांची ख्याती आहे.
मेथीच्या दाण्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते. तसंच पोटात होणारी जळजळही यामुळे कमी होते. मेथीच्या दाण्यातील उच्च फायबर सामग्री आतड्यांच्या हालचालींचे नियमन करून आतड्याच्या आरोग्यास मदत करू शकते. शिवाय, मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. ज्यांना आधीच मधुमेह आहे किंवा तो होण्याचा धोका आहे, अशा लोकांसाठी हे विशेषतः उपयुक्त ठरू शकते.
तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, मेथीच्या दाण्यांवरील प्रतिक्रिया व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात. काही लोकांना अतिसार किंवा ॲलर्जीक प्रतिक्रियांसारखे नकारात्मक दुष्परिणाम होऊ शकतात; जर त्यांनी जास्त प्रमाणात बिया खाल्ल्या तर या दुष्परिणामांमध्ये अतिसार, मळमळ आणि क्वचित चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ शकते.