DIY Makeup Remover : प्रत्येकाला आपण सुंदर, चांगले दिसावे असे वाटत असते. यासाठी विशेषत: स्त्रिया मेकअपचा वापर करतात. मेकअपमुळे केवळ लुकच नाही तर तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. पण मेकअप करताना तुमच्याकडून काही चुक झाली तर चेहऱ्याची त्वचा खराब होऊ शकतो. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी मेकअप करताना तुम्ही खालील ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

अनेकांना असे वाटते की रोज मेकअप केल्याने त्वाचा खराब होते. तसेच यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि इतर समस्या उद्भवू शकतात असे वाटते. परंतु तसे नाही, मेकअप करताना काही गोष्टींची काळजी न घेतल्याने या समस्या जाणवतात. या चुकांकडे लक्ष न दिल्यास त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते.

Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

यामुळे मेकअप करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी स्किन स्पेशालिस्ट डॉ. गुरवीन वरिच यांनी इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने, मेकअप करताना कोणत्या चुका होतात याविषयी सांगितले आहे. तिने पुढे म्हटले की, मेकअपमुळे समस्या उद्भवत नाहीत, चुकीच्या पद्धतीने लावल्यास, चुकीचा प्रोजेक्ट वापरल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने क्लिन केल्यास समस्या उद्भवतात. त्यामुळे चेहऱ्यावर मेकअपचा वापर करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

१) कोरड्या त्वचेवर मेकअपचा वापर करु नका

मेकअप करताना तुम्ही सर्वात मोठी चूक करता ती म्हणजे मेकअप तुम्ही थेट त्वचेवर लावता. कोरड्या त्वचेवर मेकअप केल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते, ज्यामुळे त्वचा खराब होते, याशिवाय कोरड्या त्वचेवर मेकअप अप्लाय होत नाही आणि केकी लूक दिसतो. म्हणून, मेकअप करण्यापूर्वी नेहमी आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करा आणि प्राइमर वापरा. तसेच दिवसाची वेळ असल्यास सनस्क्रीन लावायला विसरू नका.

२) घाणेरड्या मेकअप टूल्सचा वापर टाळा

मेकअप लावण्यासाठी आपण ब्युटी ब्लेंडर, मेकअप ब्रश इत्यादींचा वापर करतो, परंतु ते स्वच्छ नसल्यास त्यांच्याद्वारे त्वचेवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. म्हणून प्रत्येक वापरानंतर ब्युटी ब्लेंडर आणि इतर ब्रश आठवड्यातून एकदा पूर्णपणे स्वच्छ करा.

३) दररोज हाय कव्हरेज फाउंडेशन वापर करु नका

हाय कव्हरेज फाउंडेशन तुमची त्वचा पूर्णपणे फ्लॉलेस दिसण्यास मदत होते, म्हणूनच तुम्हाला ते दररोज वापरण्याचा मोह होऊ शकतो, परंतु यामुळे तुमच्या त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. त्याचा रोज वापर आणि वारंवार टचअपमुळे त्वचेवरील छिद्रे ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी लाईट बीबी किंवा सीसी क्रीम वापरा. याशिवाय रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय म्हणजे टिंटेड सनस्क्रीन. तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्याबरोबर ते चांगल्या प्रमाणात कव्हरेज देखील देऊ शकतात.

४) मेकअप तसाच ठेवून झोपू नका

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढणे खूप गरजेचे असते. असे न केल्याने त्वचेवर रक्तसंचय होण्याची समस्या उद्भवू शकते, म्हणजेच त्वचेची छिद्रे ब्लॉक होऊ लागतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी तुमचा मेकअप पूर्णपणे स्वच्छ करा.

५) मेकअप वाइप्स जास्त वापरु नका

मेकअप लावल्यानंतर तो काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे . रात्री झोपण्यापूर्वी तुमचा मेकअप नेहमी स्वच्छ करा, जेणेकरून त्वचेची छिद्रे ब्लॉक होणार नाहीत. अनेक वेळा लोक मेकअप स्वच्छ करण्यासाठी मेकअप वाइपचा वापर करतात. यामुळे पूर्ण मेकअप काढला जात नाही आणि शिवाय त्वचा आणि पर्यावरण दोन्हीसाठी हानिकारक ठरते. मेकअप वाइपचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर जळजळ होणे आणि मुरुमांची समस्या देखील वाढू शकते. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी क्लिंजिंग बाम वापरा.