Clean Kitchen Towel: स्वंयपाकघरात काम करीत असताना सातत्याने लहान टॉवेलचा वापर केला जातो. हात पुसण्यापासून ते किचन कट्टा पुसण्यापर्यंत अशा सर्व कामांसाठी टॉवेल वापरला जातो. परंतु, सततच्या वापरामुळे स्वयंपाकघरातील टॉवेलमधून दुर्गंधी येऊ लागते. अनेकदा तो स्वच्छ धुतल्यानंतरही त्याची दुर्गंधी जाता जात नाही. मग अशा वेळी नक्की काय काय उपाय करायला हवेत? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टॉवेलमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी उपाय

सूर्यप्रकाशात ठेवा

बऱ्याचदा लोक स्वंयपाकघरातील टॉवेलची योग्य तशी काळजी घेत नाहीत आणि तो ओला टॉवेल तसाच ठेवतात. त्यामुळे त्यातील जीवाणू वेगाने वाढतात आणि कालांतराने त्यातून दुर्गंध येऊ लागतो म्हणून टॉवेल धुतल्यानंतर तो थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवा.

व्हिनेगर वापरा

स्वयंपाकघरातील दुर्गंध येणारा टॉवेल साफ करण्यासाठी व्हिनेगर खूप उपयुक्त आहे. त्यासाठी एक कप पाण्यात व्हिनेगर टाकून १५ मिनिटे भिजवा. त्यानंतर हलक्या डिटर्जेंटने टॉवेल स्वच्छ धुऊन घ्या.

बेकिंग सोडा वापरा

स्वयंपाकघरातील टॉवेल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. अर्धा कप बेकिंग सोडा वॉशिंग पावडरमध्ये मिसळा आणि धुऊन घ्या. त्यामुळे टॉवेलमधील दुर्गंधी निघून जाईल.

लिंबाचा रस वापरा

लिंबाचा रस कपड्यांमधील दुर्गंधी दूर करण्यासही मदत करतो. त्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात टॉवेल भिजवा. त्यामुळे टॉवेलमधील जीवाणूंसह दुर्गंध दूर होईल.