Things Not To Consume With Jamun: उन्हाळ्याच्या दिवसात करवंद, जांभूळ, ताडगोळेदेखील शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. ही सर्वच फळं अनेक जण आवडीने खातात. जांभळापासून तयार केल्या जाणाऱ्या विविध रेसिपी सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहेत. जांभळामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत. यामुळे पचनक्रियादेखील चांगली राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
जांभूळ खाल्ल्याने कोलेजनदेखील वाढते, ते त्वचेसाठीही खूप चांगले आहे. त्वचेची चमक ठेवण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे आणि वजन कमी करण्यासाठीदेखील ते खूप प्रभावी आहे. जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत; परंतु जर त्याचे योग्यरित्या सेवन केले नाही तर ते तुम्हाला नुकसान पोहचवू शकते.
‘या’ पाच गोष्टी कधीही जांभळाबरोबर खाऊ नका
दुग्धजन्य पदार्थ
जांभळाबरोबर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेचे विकार होऊ शकतात. खरं तर, जांभळामध्ये आम्लयुक्त पदार्थ असतात, तर दुधजन्य पदार्थ क्षारीय असतात. अशा परिस्थितीत दोन्ही खाल्ल्याने पचनक्रियेचे विकार होऊ शकतात.
मसालेदार पदार्थ
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. खरं तर जांभळात फायबर आढळतात, जे पोटाला थंडावा देतात. दुसरीकडे, मसालेदार अन्न तिखट आणि गरम असते. जर हे दोन्ही एकत्र खाल्ले तर त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जीदेखील होऊ शकते.
लिंबूवर्गीय फळे
लिंबूवर्गीय फळे जांभळासोबत खाऊ नयेत. त्यांचे सेवन केल्याने आम्लपित्त वाढू शकते. खरं तर, जांभूळ आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिक अॅसिड असते, त्यांचे एकत्र सेवन केल्याने छातीत जळजळदेखील होऊ शकते.
बर्फ किंवा थंड पदार्थ खाऊ नका
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक किंवा इतर थंड पदार्थांचे सेवन केल्याने खोकला किंवा सर्दी होऊ शकते. विशेषतः मुलं आणि वृद्धांनी ते सेवन करणे टाळावे.
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जांभूळ आणि पाणी एकत्र खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो, ज्यामुळे अपचन, पोट फुगणे आणि जडपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जांभूळ खाल्ल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी पाणी प्या.