सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. चहाची तलफ असलेले बरेच सापडतील आपल्याला. अस्सल चहाबाज चहासाठी कायम टपरी वरच्या चहाला पसंती देतात. परंतु अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच मोठ्या प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो वेळोवेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करून चहा प्यायल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होते. चहा वारंवार गरम करून पिऊ नये. जाणून घेऊया तयार झालेला चहा पुन्हा गरम करून का पिऊ नये.

  • आरोग्यासाठी हानिकारक

एकदाच तयार केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिणे आरोग्यासाठी घातक आहे. कारण त्यात असलेले पोषक तत्व संपतात. जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर बराच वेळानंतर पोटदुखी, जळजळ होऊ शकते. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
  • चव आणि वाईट वास

चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याची चव आणि सुगंध नष्ट होतो. या दोन्ही गोष्टी चहामध्ये खास आहेत. याशिवाय, चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याचे पोषक घटकही कमी होतात.

(आणखी वाचा : Eating Disorders: खाण्याचे विकार काय आहेत? त्यांची कारणे कोणती? ते तोंडी आरोग्य कसे बिघडवतात, जाणून घ्या सविस्तर )

  • जीवाणूंची वाढ

एकदाच चहा तयार करून पुन्हा पुन्हा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण चहामध्ये सूक्ष्मजीव तयार होऊ लागतात. हे सौम्य जीवाणू आरोग्यासाठी हानिकारक असतात. ज्या घरांमध्ये दुधाचे प्रमाण जास्त असते तेथे दुधाचा चहा बनवला जातो. यामुळे सूक्ष्मजीव धोका वाढतो. त्याच वेळी, हर्बल चहा वारंवार गरम केल्याने त्याचे पोषक घटक नष्ट होतात.

  • टॅनिन बाहेर निघून जातं

जर तुम्ही चहाप्रेमी असाल, तर तुम्हाला चवीत कोणतीही तडजोड आवडणार नाही. पण जर तुम्ही चहा बराच काळ तसाच ठेवला तर ते  टॅनिन सोडते, ज्यामुळे चहाची चव पूर्णपणे कडू होते. अशावेळी चहा तुमच्या तोंडाची चव देखील खराब करेल.