धूम्रपान आरोग्यासाठी खूप वाईट आहे. धूम्रपान करताना सिगारेटच्या बॉक्स वर लिहिलेलं असत की धूम्रपान करणे प्राणघातक आहे. असे असताना सुद्धा अनेकजण धूम्रपान करत असतात. दरम्यान धूम्रपान व्यसन केवळ आपले शरीर कमकुवत करत नाही. तर हे हळूहळू तुमचे हृदय देखील कमकुवत करते. तर सिगारेट केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच हानी पोहोचवत नाही तर ते धूम्रपान करताना त्यांच्या संपर्कात असलेल्यांनाही हानी पोहोचवत असतात. तसेच आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सिगारेट ओढल्याने कर्करोग आणि हृदयविकाराचा झटका यासारखे धोकादायक आजार होऊ शकतात. याकरिता सिगारेटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर धूम्रपानाचे व्यसन सोडणे जरी कठीण असले तरी तुम्ही काही घरगुती उपाय करून ते सोडण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात काही घरगुती उपाय.

धूम्रपान सोडण्याचे घरगुती उपाय

– धूम्रपानची सवय सोडण्याकरिता तुम्ही दिवसभर भरपूर पाणी प्या. खरं तर शरीरातून विष काढून टाकण्यासाठी पाणी खूप फायदेशीर आहे. जेवणाच्या १५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय दर नियंत्रित राहतो. यामुळे धूम्रपान करण्याची सवय देखील हळूहळू सोडण्यास मदत होते.

– तुम्ही दररोज एक ग्लास कोमट पाण्यात जर एक चमचा मध प्यायल्याने तुम्हाला सिगारेट पिण्याची सवय सोडण्यास मदत होते.

– किसलेला मुळा मधासह खाणे. हे त्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते,जे चेन स्मोकर आहेत किंवा वाईट व्यसनाने ग्रस्त आहेत.

– धूम्रपानाची सवय कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या दररोजच्या नाष्ट्यामध्ये ओट्सचा समावेश करावा. कारण ओट्स शरीरातून विष बाहेर काढून धूम्रपानाची इच्छा कमी करण्यास मदत करते.

– जेव्हा तुम्हाला धूम्रपान करायची इच्छा होत असेल तेव्हा तुम्ही एक पाणी भरलेल्या ग्लासात अगदी चिमूटभर लाल तिखट घाला आणि प्या. याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

– जिनसेंग ही एक औषधी वनस्पती आहे. जी शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करते आणि ऊर्जा पातळी वाढवते. अशाने तुम्हाला जर सिगारेट ओढायची इच्छा झाल्यास तुम्ही जिनसेंग घ्या. याने तुम्हाला सिगारेट ओढल्यासारखे वाटणार नाही.तसेच इच्छा देखील होणार नाही.

– तुम्ही एका ग्लास पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. आणि हे पाणी तुम्ही जेवणानंतर काही दिवस नियमितपणे प्या. यामुळे धूम्रपानाचे व्यसन हळूहळू सोडून देण्यास तुम्हाला मदत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा क्षेत्रातील तज्ञांनाचा सल्ला घ्या.)