धूम्रपान आरोग्यासाठी खूप वाईट आहे. धूम्रपान करताना सिगारेटच्या बॉक्स वर लिहिलेलं असत की धूम्रपान करणे प्राणघातक आहे. असे असताना सुद्धा अनेकजण धूम्रपान करत असतात. दरम्यान धूम्रपान व्यसन केवळ आपले शरीर कमकुवत करत नाही. तर हे हळूहळू तुमचे हृदय देखील कमकुवत करते. तर सिगारेट केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच हानी पोहोचवत नाही तर ते धूम्रपान करताना त्यांच्या संपर्कात असलेल्यांनाही हानी पोहोचवत असतात. तसेच आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सिगारेट ओढल्याने कर्करोग आणि हृदयविकाराचा झटका यासारखे धोकादायक आजार होऊ शकतात. याकरिता सिगारेटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर धूम्रपानाचे व्यसन सोडणे जरी कठीण असले तरी तुम्ही काही घरगुती उपाय करून ते सोडण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात काही घरगुती उपाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धूम्रपान सोडण्याचे घरगुती उपाय

– धूम्रपानची सवय सोडण्याकरिता तुम्ही दिवसभर भरपूर पाणी प्या. खरं तर शरीरातून विष काढून टाकण्यासाठी पाणी खूप फायदेशीर आहे. जेवणाच्या १५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय दर नियंत्रित राहतो. यामुळे धूम्रपान करण्याची सवय देखील हळूहळू सोडण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do this home remedy and quit smoking scsm
First published on: 25-09-2021 at 16:56 IST