अनेकदा गाडी चालवताना बऱ्याचजणांना तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवतो. परंतु हा त्रास जर सतत जाणवत असेल तर तुम्हाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनेक कारणांमुळे डोकेदुखी उद्भवू शकते. जर तुम्ही या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. साधारणतः चष्म्याचा नंबर वाढणे, तणाव, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांमुळेही डोकेदुखी होते. आज आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.

नजर कमकुवत होणे :

जेव्हा आपली नजर कमकुवत होते, आपल्या डोळ्यांवर ताण पडतो तेव्हा डोकेदुखी सुरु होते. अशावेळी तुम्ही गाडी चालवताना अधिक सतर्क राहायला हवे. जर तुम्ही दररोज गाडी चालवत असाल तर तुम्ही अधून मधून आपल्या डोळ्यांची तपासणी करायला हवी.

औषधं न खाताही मधुमेहावर मिळवायचे आहे नियंत्रण? ‘या’ बियांचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी

तीव्र भूक लागणे :

जोरात भूक लागली असेल तेव्हाही डोकेदुखी जाणवते. वास्तविक, तीव्र भूकेमुळे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे डोकेदुखी उद्भवते आणि तुम्हाला गाडी चालवताना त्रास होतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे :

अनेकांना रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर डोकेदुखीची समस्या जाणवते. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे बहुतेकांना ड्रायव्हिंग करताना डोकेदुखीचा त्रास होतो. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर तुम्ही फळे सोबत ठेवावीत.

Photos : मधुमेहाच्या आजारावर ‘ही’ फळे ठरतात फायदेशीर; आजच आहारात समावेश करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी चालवताना डोकेदुखी जाणवत असेल तर या गोष्टी करा :

  • वेळोवेळी पाणी पित राहा. पाण्यासोबत तुम्ही नारळपाणी आणि लिंबूपाणीही पिऊ शकता. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील.
  • जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही वेळोवेळी काही ना काही खात राहा. यामुळे तुमची डोकेदुखी दूर होईल.
  • डोळे तपासत राहा. कारण कधी कधी चष्म्याचा नंबर वाढला तरी डोकेदुखी होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)