Tips To Keep Diabetes Under Control: जर तुम्हालाही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्हालाही माहीत आहे की, याला नियंत्रित करणे एवढे सोपे नाही. जर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये काही सवयी समाविष्ट केल्या तर त्यामुळे तुम्ही साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. प्रत्येक मधुमेही रुग्णाचा डोस आणि आहार वेगळा असतो, परंतु काही टिप्स किंवा सवयी प्रत्येकजण पाळू शकतो. या सवयींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ज्यामुळे तुम्हाला साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही कोणती दिनचर्या पाळली पाहिजे हे जाणून घेऊया.

मधुमेहाच्या बाबतीत ही दिनचर्या पाळा

रक्तातील साखरेची पातळी ट्रॅक करा

जर तुम्हाला मधुमेह असेल तर दररोज रक्तातील साखरेची पातळीचा मागोवा घेणे महत्त्वाचे आहे. ही सवय तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा. तुम्ही दररोज सकाळी जेवणापूर्वी साखर तपासली पाहिजे. याद्वारे तुम्हाला कळेल की तुमच्या शरीरावर कोणत्या क्रियाकलापांचा काय परिणाम होतो.

( हे ही वाचा: Monkeypox Virus: गर्भवती महिला आणि मुलांना मंकीपॉक्सचा धोका जास्त असतो; अशाप्रकारे स्वतःचे संरक्षण करा)

वेळेवर औषध घ्या

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांचे औषध वेळेवर घ्यावे. बरेच लोक इन्सुलिन या औषधाची काळजी घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी चढ-उतार होत असते, लोकांचा गैरसमज असतो की औषध घेतल्याने वजन वाढते, पण तसे नाही. औषधोपचारांसह निरोगी दिनचर्याचे पालन केल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

दररोज ३० मिनिटे व्यायाम करा

शारीरिक हालचालींद्वारे तुम्ही रक्तातील साखर नियंत्रित करू शकता. जेव्हा तुम्ही सक्रिय असता तेव्हा शरीरातील पेशी साखरेची पातळी कमी करतात. शरीरातील इन्सुलिनची पातळी योग्यरित्या कार्य करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

( हे ही वाचा: monsoon tips: पावसाळ्यात त्वचेला उठणाऱ्या खाजेमुळे हैराण आहात? ‘या’ घरगुती उपायांमुळे त्वरित आराम देईल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झोपण्यापूर्वी साखरेची पातळी तपासा

झोपण्यापूर्वी शेवटच्या वेळी साखरेची पातळी तपासली पाहिजे. या दरम्यान, साखरेची पातळी तपासल्यानंतर, आपण दिवसभरात साखरेची पातळी योग्यरित्या नियंत्रित करण्याच्या पद्धतींचा अवलंब केला आहे की नाही याची कल्पना येईल.