झोपताना तोंड उघडे ठेवण्याची सवय अनेक लोकांना असते पण ही फक्त एक सवय नाही तर हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. पण वारंवार तोंडाने श्वास घेतल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तोंड उघडे ठेवून झोपण्यामुळे सतत तोंड कोरडे पडणे, दात अन्य इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याचे कारण ठरू शकते. ज्या लोकांना वारंवार तोंड कोरडे पडल्यासारखे वाटते त्यांच्या दातांमध्ये पोकळी असण्याचा धोका जास्त असू शकतो. त्यामुळे हिरड्यांसंबधीत आजार आणि दातांचे नुकसान होऊ शकते.

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्समध्य पल्मोनरी, क्रिटीकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागामध्ये डॉक्टर विजय हुड्डा यांनी सांगितले की, तोंड उघडे ठेवून झोपल्याने आरोग्यासंबधीत समस्या निर्माण होऊ शकते. डॉ. विजय हुड्डा यांच्या मते, झोपताना तोंड उघडे ठेवणे कित्येक लोकांसाठी सामान्य गोष्ट आहे. पण ही सवय सामान्य नाही तर काही आजारांचे लक्षण आहे. तोंड उघडे ठेवून झोपणे कित्येकदा शरीरात दडलेल्या गंभीर समस्यांचे लक्षण आहे.

नेजल सेप्टम कार्टिलेज

झोपेत तोंड उघडे राहण्या मागेही सेप्टम कार्टिलेज समस्या असू शकते, त्याला नेजल सेप्टम कार्टिलेज असेही म्हणतात. प्रत्यक्षात, नेजल सेप्टम कार्टिलेज ही नाकाच्या आत एक पातळ, लवचिक रचना आहे जी नाकाच्या मार्गाला दोन भागांमध्ये विभाजित करते. ते नाकाच्या खालच्या भागाला आधार देते आणि नाकाला आकार देण्यास मदत करते. विजय हुडा यांच्या मते, नेजल सेप्टम कार्टिलेज नैसर्गिकरित्या थोडासा वाकडा असतो, तो अजिबात सरळ नसतो, परंतु जर तो खूप वाकडा झाला तर तो नाकाचा एक भाग ब्लॉक करतो, म्हणजेच डेविएटेड नेजल सेप्टम (DNS) असल्यास, लोक तोंडातून श्वास घेण्यास देखील सुरुवात करतात

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया

तोंडातून श्वास घेणे हे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) चे लक्षण असू शकते. मुलांमध्ये OSA चे एक सामान्य कारण म्हणजे नाक आणि घशाच्या मागील बाजूस असलेल्या ग्रंथींचा दाह होण्याची स्थिती आहे. सुजलेल्या अ‍ॅडेनोइड्स असलेली अनेक मुले नाकातून श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे तोंड उघडे ठेवून झोपतात.

तोंड उघडे ठेवून झोपणे कसे थांबवायचे?

बऱ्याच प्रकरणांमध्ये, तोंड उघडे ठेवून झोपणे थांबवण्यासाठीसर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचे कारण शोधणे आणि त्यावर उपचार करणे. उदाहरणार्थ, ह्युमिडिफायर्स आणि सलाईन नेजल स्प्रे नाकातील रक्तसंचय दूर करण्यास मदत करू शकतात त्यामुळे तोंडातून श्वास घेण्याची समस्या निर्माण होते. या स्थितींवर उपचार केल्यानंतर ऍलर्जी, दमा किंवा सायनस इन्फेक्शनमुळे तोंडातून श्वास घेण्याच्या समस्या सुधारू शकतात.