दुधावरील साय ही एक नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थ आहे जी दूध उकळल्यानंतर आणि थंड केल्यानंतर त्यात तयार होते. घरच्या घरी तूप बनवण्यासाठी बऱ्याचदा लोक दुधावरील साय बाजूला काढून ठेवतात. दुधावर जमा होणारी घट् थर ज्याला साय म्हणतात. ही साय फॅट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे असे मानले जाते. लोक अनेकदा अन्नाची चव वाढवण्यासाठी सायचा वापर करतात. दुधातील साय ही फॅट्स आणि पोषक तत्वे भरपूर असतात, परंतु लोक ते पिण्यास घाबरतात. दुधाच्या सायमध्ये असलेले फॅट लोकांच्या भीतीचे कारण आहे.
डॉक्टर अनेकदा सल्ला देतात की,”तुम्ही फॅटस् असलेले पदार्थ टाळावे कारण ते तुमच्या हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. आता प्रश्न असा उद्भवतो की,” दूधावरील साय कोलेस्ट्रॉल वाढवू शकते का? साय खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? चला डॉक्टरांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
दूधावरील साय खाल्याने कोलेस्ट्रॉल वाढतात का?
दूधावरील साय ही प्राणी आधारित अन्नाचा प्रकार आहे ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल असते. आयुर्वेद मार्गदर्शक डॉ. सीम गुप्ता यांनी सांगितले की, दूधावरील साय ही प्राण्यांकडून मिळणारा पदार्थ आहे ज्यात कोलेस्ट्रॉल असते पण याचा अर्थ असा नाही की साय खाल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हृदयासंबंधी आजारांचे कारण ठरेल.
अधिकृत आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका व्यक्तीला रोज जास्ती जास्त ३०० मिलीग्रॅम कोलेस्ट्ऱॉलचे सेवन केले पाहिजे. १०० ग्रॅम दूधाच्या मलईमध्ये ६८ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. जर तुम्ही रोज १०० ग्रॅमपेक्षा थोडी जास्त साय खाल्ली तर कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादीत प्रमाणत असते. कोलेस्ट्रॉल आणि हृदयांच्या आजाराचा थेट संबध आहे. त्यामुळे त्यांना लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे त्यांनी हृदयरोगाचा धोका जास्त असतो.
दुधावरील साय खाल्याने वजन वाढते की कमी होते?
दूधावरील सायमध्ये फॅट्स असतात ज्याचे सेवन जास्त केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो पण पण तुम्हाला माहिती आहे की साय मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास तुमचे वजन देखील नियंत्रित करू शकते.सायमध्ये उच्च फॅट्सयुक्त घटक असतात ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि जास्त खाण्याची इच्छा नियंत्रित होते.
साय खाण्याचे आरोग्य फायदे
साय हे पोषक तत्वांचे एक शक्तिशाली केंद्र आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई असते जे हाडे मजबूत करते. साय खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते. ते खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारतो. सायमध्ये असलेले आरोग्यदायी फॅट्स आणि प्रथिने त्वचेचे पोषण करतात आणि त्वचेचा रंग सुधारतात. मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी हेल्दी फॅट्स आवश्यक असतात सायमध्ये संतृप्त फॅट्स भरपूर प्रमाणात असतात जी मेंदूच्या पेशींची रचना आणि कार्य सुधारतात.