केस गळण्याची समस्या ही प्रत्येकाला उद्भवते. परंतु, याचे प्रमाण जर जास्त असेल तर ही चिंतेची बाब आहे. सध्या १३ ते ३० वयोगटातील व्यक्तींचे केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र , किशोरवयीन मुलांमध्ये केस गळण्याचे मुख्य कारण समजल्यानंतर ते रोखले देखील जाऊ शकते. त्यासाठी यावर वेळीच उपचार घेतल्यास तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

जास्त ताण, कमी झोप, पोषक आहाराची कमी अशा अनेक कारणांमुळे किशोरवयीन मुलांचे केस गळू शकतात. तसंच हार्मोनल असंतुलन आणि केसांची योग्यरित्या काळजी न घेतल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितिमध्ये वेळीच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. लहान वयात केस गळण्याची अशी अनेक कारणे आपण जाणून घेणार आहोत. ही कारणे जाणून घेऊन त्यावर उपचार केल्यास तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

लहान वयात केस गळण्याची कारणे कोणती ?

१. हार्मोनल बदल

तारुण्य आणि पौगंडावस्थेतील हार्मोनल बदलांमुळे केस गळणे सुरू होऊ शकते. थायरॉईड आणि पुनरुत्पादक हार्मोन्स केसांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात. जर यामध्ये असंतुलन निर्माण झाले तर केस गळण्याचे प्रमाण देखील वाढते.
थायरॉईडच्या समस्यांमुळे केस गळणे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सामान्य आहे. PCOS असलेल्या महिलांमध्ये किशोरावस्थेत केस गळणे सुरू होऊ शकते.

२. अपुरे पोषण

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या केस गळतीवर देखील होऊ शकतो. साखरेपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते. अशक्तपणा , बुलिमिया, एनोरेक्सिया आणि क्रॅश डाएट ही पौगंडावस्थेतील आणि तरुण वयात केस गळण्याची सामान्य कारणे आहेत.

३. अतिरिक्त ताण

मानसिक ताण हे लहान वयात केस गळण्याचे मुख्य कारण आहे. पौगंडावस्थेत व्यक्तीमध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल होत असतात. यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंध आणि इतरांच्या दबावामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे केस गळू शकतात

४. औषधे

किशोरवयीन मुलांमध्ये अनेक बदल होत असतात. त्यामुळे मुरूम, डिप्रेशन अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलं त्यावर उपाय म्हणून वेगवेगळी औषधे घेतात. यामुळे देखील केस गळू लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

५. ओव्हर – स्टायलिंग

हेअर स्टाइलिंग टूल्स जसं की ब्लो ड्रायर, हेअर स्ट्रेटनर यांचा वापर वारंवार केल्याने केस खराब होतात आणि तुटू लागतात. तसंच केसांना कलरिंग वारंवार केस शिथिल करणे हे देखील केस गळण्याचे कारण असू शकते.

६. ट्रॅक्शन एलोपेशिया

केस जास्त ताणल्यामुळे टक्कल पडण्याच्या समस्येला ट्रॅक्शन एलोपेशिया म्हणतात. ही टक्कल पडण्याची समस्या अशा लोकांमध्ये आढळते जे आपले केस लांब केल्यानंतर, पुरुष बन, वेणी, हेल्मेट, स्पोर्ट्स गियर आणि ओव्हरहेड इअरफोन तसेच वाढवलेल्या केसांची शैली राखतात. याशिवाय जे लोक दीर्घकाळ एकच हेअरस्टाइल फॉलो करतात त्यांना केस गळण्याची समस्या देखील होऊ शकते.

७. ट्रायकोटिलोमॅनिया

हा एक वर्तणूक विकार आहे. या समस्येमध्ये व्यक्ती केस ओढू लागते. त्यामुळे टाळूवर टक्कल पडते. हा एक मानसिक विकार आहे जो प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो. पण त्याची प्रकरणे पुरुषांमध्येही दिसतात.