सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात चांगली झोप मिळणे हे सर्वात मोठं सुख. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आपण या बाबीकडे दुर्लक्ष करतो. चांगली झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तज्ञांनुसार दिवसातल्या २४ तासांपैकी ८ तास झोप घेणे उत्तम असते. मात्र झोप न येणे ही समस्या आजकाल प्रत्येकालाच भेडसावते. हल्ली सर्वांचीच झोपेच्या संबंधी तक्रार असते की झोपायला गेल्यावर लगेच झोप येत नाही.

आरोग्य तज्ञांनुसार, आपली झोपच अनेक गंभीर आजारांचा इलाज आहे. जेव्हा आपण काम करून थकून जातो तेव्हा झोपेमुळे आपल्या शरीराला आणि मेंदूला आराम करण्यासाठी वेळ मिळतो. परंतु आजकाल लोकांची झोप फारच कमी झाली आहे. चांगली झोप घेण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्यांची मदत घ्यावी लागत आहे. परंतु गोळ्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तुम्हाला देखील चांगली झोप लागत नसेल तर काही टिप्सचा वापर करून तुम्ही चांगली झोपही घेऊ शकता आणि यामुळे तुमच्या शरीराला पुरेसा आरामही मिळेल.

चुकीच्या सवयींमुळे लागत नाही चांगली झोप; ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून दूर करा समस्या

फिटनेस तज्ञ जस्टिन ऑगस्टीन यांनी झोपेच्या समस्येशी लढत असणाऱ्या लोकांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी लगेच झोप लागण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही केवळ २ मिनिटांमध्ये झोपू शकता. अमेरिकन मिलिटरी सर्व्हिसशी संबंधित लोकही या टिप्स वापरतात. या टिप्स सुमारे ९६ टक्के काम करतात आणि ज्यांनी त्या फॉलो केल्या आहेत त्यांना चांगला परिणाम मिळाला आहे. या टिप्सचे दोन भागात विभाजन केले आहे.

पहिला भाग :

  • सर्वप्रथम तुमचा जबडा, जीभ आणि डोळ्यांच्या स्नायूंना आराम द्या.
  • आपल्या हातांना आराम द्या आणि आपले हात हलके सोडा.
  • आपल्या छातीला आराम द्या आणि श्वास सोडा.
  • तुमचे पाय वरपासून खालपर्यंत मोकळे सोडून द्या.

दुसरा भाग :

पहिला भाग पूर्ण झाल्यावर दुसऱ्या भागाला सुरुवात करा. आपल्या मनात एखाद्या चित्राची कल्पना करा. यानंतर १० सेकंड मनामध्ये एक ओळ म्हणा – विचार करू नका, विचार करू नका, विचार करू नका. असे केल्याने तुम्हाला २ मिनिटांच्या आतच गाढ झोप यायला सुरुवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, प्रत्येक माणसाची स्थिती एकसारखी नसते. एखादी व्यक्ती इच्छा असूनही स्वतःला मोकळे करू शकत नाही. अशा परिस्थितीत, ही पद्धत प्रत्येक व्यक्तीला लागू होईलच असे नाही.