गुढीपाढवा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण दरवर्षी घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केसा जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा असा हा दिवस प्रत्येक घरात उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाढवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. नव वर्षाचं स्वागत उत्साह, आनंदाने केले जाते. घरोघरी गुढी उभारली जाते. या दिवशी दारी आंब्याचे तोरण बांधलं जाते, स्त्रिया दारात सुंदर रांगोळी काढतात. अनेक महिलांकडे सुंदर रांगोळी काढण्याचे कौशल्य असते त्यामुळे त्या कितीही अवघड रांगोळी सहज काढू शकतात. पणा काहींना गुढीची रांगोळी काढावी असे वाटते पण जमत नाही. काळजी करू नका येथे काही हटके टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सुरेख गुढीची रांगोळी काढू शकता.

गुढीचा रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला फक्त एक पळी आणि काही बांगड्यांची आवश्यकता आहे. पळी आणि बांगड्या वापरून कोणीही गुढीची रांगोळी सहज काढू शकते.

कशी काढावी गुढीची रांगोळी?

प्रथम दारासमोर जिथे रांगोळी काढायची आहे तिथे एक पळी पालथी ठेवा. पळीचा गोल भाग वरच्या बाजूला राहील आणि दांडा खालच्या दिशेने अशी ठेवा. पळीच्या खालच्या दांडीपासून बांगड्या ठेवा. सहा बागंड्या एकापुढे एक ठेवा. एका वक्ररेषेत या बांगड्या ठेवा. आता पळीच्या गोलकार भागापासून प्रत्येक बांगडीपर्यंत एक एक करून रांगोळी वापरून रेष ओढा. त्यांनतर त्यामध्ये तुमच्या रांगोळीचे रंग वापरा. साडीच्या निऱ्या दिसतील असे रंग भरा. त्यानंतर बांगडीच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुसरा रंग टाका आणि गोलाकार चमचा त्यावर गोल फिरवा. मधोमध दुसरा रंग भरा. पुन्हा गोलाकार चमचा हळूवारपणे गोल गोल फिरवा आणि त्यात तिसरा रंग भरा. साडीच्या निऱ्यांवर ठिपके काढा. त्यानंतर पळीच्या आकारानुसार रांगोळी काढून घ्या आणि पळी हळूच बाजूला काढा. आता पळीच्या गोलाकार भागाला तांब्याचा आकार द्या. तुम्हाला गुढीचा आकार दिसेत आता त्यात छान रंग भरा. गुढीच्या तांब्यावर स्वस्तिक काढा. त्यानंतर फुलांची माळ दाखवण्यासाठी पिवळा आणि केसरी रंग वापरून गुढीच्या काठीवर नागमोडी ओळीत मोठे ठिपके काढा. त्यावर आता पेनाने ठिपके देऊन फुलाचा आकार द्या. आता साखरेची शुभ्र गुढी दाखवण्यासाठी रांगोळीतील साडीव चार-पाच पांढऱ्या रांगोळीचे ठिपके काढा आणि गोलाकार चमच्याने हळूवारपणे फिरवा. त्यानंतर पानांची माळ दाखवण्यासाठी फुलांच्या माळे शेजारी छोटे छोटे हिरव्या रंगाचे ठिपके द्या आणि पानांचा आकार द्या. तुमची गुढीची सुंदर रांगोळी तयार आहे. तुमची रांगोळी पाहून प्रत्येकजण तुमची प्रशंसा करेल.

हेही वाचा – एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?

हेही वाचा – एप्रिल फुल नव्हे खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केलीOla Soloची घोषणा, पाहा Video

तुम्हाला फारशी रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही Hashtag Rangoli नावाच्या युट्युबपेजवर ही रांगोळी कशी काढावी पाहू शकता.