ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा खुलासा केला आहे. ओला सोलो नावाची, ही जगातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे म्हटले जाते. भारतातील पहिली चालकाशिवाय धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओला सोलोची सोमवारी घोषणा करण्यात आली. ही घोषणा १ एप्रिल रोजी केल्यांनी एप्रिल फूल डे जोक असल्याचं अनेकांना वाटत होतं, पण आता भाविशनं त्याला पुष्टी केली. हा एप्रिल फुल जोक नसून लवकरच ही स्कुटर बाजारात येणार असल्याचे जाहीर केले,

भाविश अग्रवाल यांनी X वर लिहिले, “ हा फक्त एप्रिल फूलचा विनोद नाही आम्ही काल ओला सोलोची घोषणा केली आहे. ही व्हायरल झाली आहे आणि कित्येक लोक त्यावर वाद घालत आहे की हे सत्य नाही एप्रिल फुलचा जोक आहे. व्हायरल व्हिडीओचा उद्देश लोकांना हसवण्याचा होतो. त्यामागील तंत्रज्ञान असे ज्यावर काम करत आहे आणि प्रोटोटाइप बनवला आहे. हे दर्शवते की, आमची इंजिनअरिंग टीम कशाप्रकारे हे काम करण्यास सक्षम आहे.

हेही वाचा – स्ट्रॉबेरी खाण्याआधी हा व्हिडीओ एकदा बघाच! पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही

ते म्हणाले, “ओला सोलो ही मोबिलिटीच्या भविष्याची झलक आहे आणि आमचे इंजिनअरिंग टीम चालताशिवाय चालणारी दुचाकी निर्माण करण्यासाठी आणि Self-balancingतंत्रज्ञानावर काम करत आहेत, जे तुम्हाला आमच्या भविष्यातील उत्पादनांमध्ये दिसेल.”

हेही वाचा – बोलेरो मॉडेलचा वापर करून तयार केली Driverless Car ! भोपाळच्या स्टार्टअपवर आनंद महिंद्रा झाले खुश!

व्हिडिओ ७ लाख ४० ते अधिक वेळा दिसला आणि अनेकां या व्हिडीओला त्याला लाइक केले. एक ग्राहकाने कमेंट केली, “अगर तो हकीकत बनला तो OLA भारतीय बाजार अछूत हो.” एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “ओलामध्ये अग्निशामक अपघात आणि गुणवत्ता कारणीभूत कारणास्तव ड्रायव्हिंग अपघात ही संबंधित कारणास्तव आहे, जर मार्गदर्शक ड्रायव्हिंग करतो तो आम्हाला तब्येतीने कगार करतो.” तिसऱ्या ने लिहिले आहे, सर्वात पहिले विद्यमान स्कूटर आणि कॅबची गुणवत्ता सुधारित करा.