उन्हाळा जवळ आला आहे. अशा स्थितीत शरीराला हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रोज नारळ पाणी पिण्याची सवय तुमच्या आहारात समाविष्ट करून घ्या. कारण नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जे जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. असे मानले जाते की, नारळाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे आणखी कोणकोणते फायदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिण्याची शिफारस केली जाते. वास्तविक, असे मानले जाते की नारळाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सवर अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक; वेळीच व्हा सावध

रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते

नारळपाणी प्यायल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. नारळात सुमारे ६०० मिलीग्राम पोटॅशियम आढळते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

उलटीचा त्रास रोखण्यासाठी नारळपाणी फायदेशीर

उलट्या आणि जुलाबाच्या समस्येवरही नारळ पाणी खूप गुणकारी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नारळाचे पाणी प्याल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नारळपाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब, पोटात जळजळ, आतड्यांमधली जळजळ, अल्सर या समस्याही दूर होतात.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink coconut water daily in summer to combat heat wave the body will have these benefits pvp
First published on: 19-03-2022 at 18:19 IST