स्वयंपाकात मसाल्याप्रमाणे वापरला जाणारा लसूण प्रत्यक्षात एक प्रभावशाली औषध आहे. शतकानुशतके त्याचा वापर आजारांवर उपचार करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जात आहे. लसूणमध्ये आढळणारे सल्फर संयुग जसे की अ‍ॅलिसिन, डायलील डिसल्फाइड आणि एस-अ‍ॅलिली सिस्टीन शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत करतात. हे संयुग कॅन्सर पेशींची वाढ थांबवतात, डीएनएची दुरुस्ती करतात आणि शरीराला सुरक्षित ठेवतात.

लसणाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तो रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि धमन्यांमध्ये प्लाक तयार होण्यापासून प्रतिबंध करतो. यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होते जे हृदयरोगाचे मुख्य कारण असते. अनेक संशोधनांत सिद्ध झाले आहे की, नियमित लसूण सेवन केल्यास रक्तातील साखरचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे मधूमेहाचा धोका घटतो.

EatingWell च्या मते लसूणमध्ये जिवाणूनाशक, विषाणूनाशक आणि बुरशीरोधक गुणधर्म असतात. यामुळे यकृत शुद्ध होतो आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. लसूण हा फक्त मसाला नसून एक नैसर्गिक औषध आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, “दररोज दोन लसणाच्या पाकळ्या देशी तुपात भाजून खाल्ल्यास १०० टक्क्यांपर्यंत कोलेस्टेरॉल नियंत्रणात येतो. पण लसणाचे सेवन त्याचे पाणी बनवून केले तर ते खऱ्या अर्थाने आरोग्यासाठी अमृत ठरते.”

रोगप्रतिकारशक्ती होते मजबूत (Boosts Immunity)

लसूणमध्ये असलेला अ‍ॅलिसिन कंपाउंड एंटीमायक्रोबियल, एंटीव्हायरल आणि एंटिफंगल गुणांनी समृद्ध आहे. सकाळी काही लसणाच्या पाकळ्या पाण्यात उकळून प्यायल्यास हंगामी आजारांपासून बचाव होतो. हा पाणी सर्दी-खोकला आणि फ्लूवर उपयोगी ठरतो व रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते (Keeps Heart Healthy)

लसूण पाणी धमन्यांमधील खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढते. हे पाणी रोज प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होतो. त्यामुळे हृदयरोगाचा धोका घटतो आणि हृदय निरोगी राहते.

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात (Detoxifies the Body)

लसणातील सल्फर संयुग यकृत आणि मुत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवते. लसूण पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीर शुद्ध होते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

पचन सुधारते (Improves Digestion)

लसूण पाणी रोज प्यायल्याने पचन एन्झाईम सक्रिय होतात. त्यामुळे अन्न सहज पचते. यात असलेले प्रीबायोटिक गुण आतड्यांचे आरोग्य सुधारतात. हे पाणी वाईट बॅक्टेरिया नष्ट करून पचनसंस्था निरोगी ठेवते.

सूज आणि दाह कमी करते (Reduces Inflammation)

लसूण पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि सूज-रोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि संधिवात, स्नायू वेदना अशा समस्यांतून आराम मिळतो.