आजही अनेकांच्या घरात भांडी ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या स्टँडचा वापर केला जातो. सहसा हा स्टँड भिंतीवर लावला जातो, त्यामुळे त्याची नियमितपणे स्वच्छता करता येत नाही. हळूहळू त्यावर इतकी घाण साचते की, फक्त ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करणे शक्य होत नाही. तसेच किचनमधील जेवणाला फोडणी दिल्याने स्टँडवर तेलाचे चिकट डाग पडतात. मॉड्युलर किचनमुळे आता भांड्यांचे स्टँड कोणी वापरत नाही. पण, ज्यांच्या घरी स्टँड आहेत त्यांच्यासाठी हे स्टँड स्वच्छ करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

व्हिनेगर

भांड्यांच्या स्टीलच्या स्टँडवरील चिकटपणा दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनेगर, दोन चमचे पाण्यात टाका, आता या मिश्रणात एक कपडा भिजवा आणि त्याने स्टँड नीट घासून घ्या. हे मिश्रण संपूर्ण स्टँडवर नीट लावून घ्या, यानंतर ताबडतोब कोमट पाण्याने स्टँड पुसून कोरड्या कपड्याने सुकवा.

बेकिंग सोडा

सर्वप्रथम एका भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट भांड्याच्या स्टँडवर लावून २० मिनिटे असीच ठेवा. आता डिशवॉशने स्टँड स्वच्छा करा,शेवटी कोमट पाण्याने स्टँड धुवा आणि कोरडा करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे स्टिलचा स्टँड बरेच दिवस राहील स्वच्छ

भांड्याचा स्टीलचा स्टँड बराच काळ स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलमध्ये सुती कापड हलका भिजवा आणि नीट घासून घ्या. पण जास्त तेल वापरू नका. अन्यथा स्टँड खूप चिकट होईल.