जेवण बनवताना बऱ्याचदा त्यासाठी वापरण्यात येणारी भांडी उष्णतेमुळे काळी पडू शकतात किंवा कधीकधी भांडी जळतात. अशा जळलेल्या भांडयांना स्वच्छ करण्याचे मोठे टेन्शन गृहीणींना असते. कारणं ते लवकर स्वच्छ होत नाहीत, त्यासाठी खूप वेळ वाया घालवावा लागतो. काही घरगुती उपाय वापरून यावर उपाय करता येऊ शकतो. काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही जळलेली भांडी लगेच स्वच्छ करू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त टिप्स

व्हिनेगर
व्हिनेगरच्या मदतीने भांडयांवरील डाग सहज निघण्यास मदत होते. यासाठी व्हिनेगर आणि मीठ यांचे मिश्रण तयार करुन ते जळलेल्या भांड्यात ठेवा. ४ ते ५ तासांसाठी भांडे तसेच असू द्या, त्यानंतर ते भांडे स्वच्छ धुवून घ्या.

आणखी वाचा: मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चुकूनही करू नका ‘हे’ पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिश्रण बनवून, ते जळलेल्या भांड्यावर लावा. २० ते ३० मिनिटांनंतर ते भांडे स्वच्छ धुवून घ्या. यामुळे डाग निघण्यास मदत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांदा
ज्या भांड्यावर डाग पडले आहेत, त्यामध्ये पाणी आणि चिरलेला कांदा टाकून गरम करा. हे पाणी उकळून घ्या. यामुळे भांड्यावरील डाग निघण्यास मदत होईल.