how to Clean The Sliding Window: आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच घराला स्लायडिंग विंडोज असतात. घराला स्लायडिंग विंडोज असली की, खिडकी उघड – बंद करणे सोपे जाते. स्लायडिंग विंडोज दिसतानाही फार छान दिसतात. स्लायडिंग विंडोज बसवण्यासाठी आधी त्याचे ट्रॅक खिडकी लावायच्या जागी अॅटॅच केले जातात. मग या ट्रॅकमध्ये खिडकी बसवली जाते. स्लायडिंग विंडोजची स्वच्छता व्यवस्थित करता येते, परंतु नुसत्या खिडक्या स्वच्छ करुन फायद्याचे नाही. या खिडक्यांच्या अॅल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करणे हा खूप मोठा टास्क असतो.
घरात स्लायडिंग खिडक्यांत खूपच घाण जमा होते. या खिडक्यांची साफ साफाई करणे हे खूप अवघड काम आहे. अशा परिस्थितीत काही सोप्या गोष्टींची मदत घेऊन तुम्ही घरात बसवलेल्या काचेच्या खिडक्या आणि दरवाजे काही मिनिटांत सहज चमकू शकता. धूळ, माती काचेच्या खिडक्या आणि दरवाजे लवकर घाण होतात. हे काम अतिशय किचकट किंवा कंटाळवाणं असलं तरीही ते झटपट कसे करता येईल ते पाहूयात. यासाठीच हे अॅल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करण्याच्या दोन सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात
स्लायडिंग विंडोजचे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी आपल्याला भांडी घासायची हिरवी स्पंजची घासणी व एक क्लिप लागणार आहे. सगळ्यांत आधी ही हिरवी घासणी लिक्विड सोपं किंवा साबणाच्या पाण्यात भिजवून ओली करून घ्यावी. त्यानंतर बरोबर मधोमध एक फोल्ड देऊन घासणी दुमडून घ्यावी. दुमडून घेतलेल्या भागाच्या मध्ये एक कपड्यांना लावतो तो क्लिप बसवून घ्यावा. आता घासणीची एक बाजू बंद असेल जी फोल्ड करून क्लिपमध्ये अडकवली होती. तर दुसरी बाजू ओपन असेल. हा ओपन असलेला भाग अॅल्युमिनियम ट्रॅकच्या अरुंद खाचांमधे जाईल आणि यामुळे आपण अॅल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता करु शकता.
बेकिंग सोडा वापरा
अशा स्थितीत काचेवरील तेल आणि ग्रीसचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट काचेच्या खिडक्या आणि दरवाजांवर लावा. काही वेळ सुकल्यानंतर ग्लास स्वच्छ पाण्याने धुवा.
या बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही देखील स्लायडिंग व्हिंडो साफ करू शकता. हा साधा सोपा उपाय तुम्ही देखील वापरू शकता. काचेच्या खिडक्या आणि दरवाज्यावरील हँडल साफ करण्यासाठी मीठ आणि लिंबूची मदत घ्या. यासाठी लिंबाच्या रसात मीठ मिसळून उपाय बनवा. लिंबाच्या रसाऐवजी, आपण पांढरे व्हिनेगर देखील वापरू शकता.