लठ्ठपणा कमी करणे ही आजच्या धावपळीच्या जीवनातील सर्वात कठीण समस्या बनली आहे. यासाठी अनेकवेळा आरोग्यदायी आहार घ्यावा लागता आणि जिममध्ये घाम गाळावा लागतो. तरीदेखील लठ्ठपणापासून सुटका होत नसल्याची तक्रार होत असते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामासोबतच तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही खाण्यापिण्याची काळजी घेतली तर लवकरच तुमचे शरीर फीट राहील. वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता. वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तुम्ही लसणाचे सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी हा सुरक्षित आणि आरोग्यदायी घरगुती उपाय आहे.
बरेचदा लोक सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खातात, त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला डिटॉक्सिफाय करता येते. एवढेच नाही तर उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचे आरोग्यदायी फायदे देखील लसणाचा आहारात समावेश केल्याने ऊर्जा पातळी वाढण्यास आणि चयापचय वाढण्यास मदत होते. हे शरीरातून विष काढून टाकण्यास मदत करते. हे डिटोक्सिफायिंग एजंट म्हणून काम करते. आपण वजन कमी करण्यासाठी आहारात लसणाचा समावेश करावा.
लसूण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, कारण त्यामुळे शरीरात साठलेली चरबी वितळते. लसणातील बूस्टिंग लेव्हल कॅलरी बर्न करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्ही वारंवार खाणे टाळता.
(हे ही वाचा : महिलांनो PCOS चा त्रास होतो? मग कोणता आहार घेतला तर फायदा होईल? स्त्रीरोग तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला येईल कामी! )
लसूण गरजेपेक्षा जास्त खाल्यामुळे ‘हे’ दुष्परिणाम होऊ शकतात
- अधिक प्रमाणामध्ये लसूण खाल्यामुळे बर्याचशा गंभीर व्याधी होऊ शकतात. लसणाचे अधिक प्रमाणामध्ये सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.
- आपल्या वजनाच्या हिशोबाने ०.५ ग्रॅमपेक्षा जास्त लसूण खाल्यास यकृतामध्ये बिघाड होऊ शकतो असे अध्ययनातून सिद्ध झाले आहे.
- लसणाचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने पोटामध्ये जळजळ होऊ शकते.
- जास्त लसूण खाल्यामुळे अतिसार होण्याची शक्यता असते.
- गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग असलेल्यांनी लसूण खाणे टाळावे.
म्हणून शरीराच्या गरजेनुसार लसणाचे सेवन केल्यास साइड इफेक्ट्स टाळता येऊ शकतात.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)