अनेक खाद्यपदार्थांच्या साली काढून आपण फेकून देतो. मात्र, त्यातही पोषक तत्वे असतात. जसे की, संत्र्याची साल, सफरचंदाची साल, कलिंगडाची साल तसेत बदामाची सालही. आपल्यापैकी बरेच जण बदाम रात्रभर भिजवतात, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची साल काढून खातात. मात्र आता असं करू नका. कारण- बदामाच्या सालीतही पोषण असते, जे पचनापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींना आधार देऊ शकणारे फायदे आहेत. म्हणून पुन्हा भिजवलेले बदाम खाताना त्याची साल फेकून देऊ नका..
दररोज बदाम खाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे
बदामाची साल का महत्त्वाची आहे हे जाणून घेण्यापूर्वी, बदाम तुमच्या शरीरासाठी सामान्यतः काय करू शकतात हे समजून घेऊयात.
पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा खालील गोष्टी सांगतात:
१. रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात – बदाम हे मॅग्नेशियमचे समृद्ध स्रोत आहेत, जे हृदयाच्या आरोग्यास समर्थन देणारे आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करणारे एक महत्त्वाचे खनिज आहे. ते नियमितपणे खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारू शकते आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
२. मूड सूधारू शकतो – बत्रा यांच्या मते, बदामांमध्ये ट्रिप्टोफॅन असते, एक अमिनो आम्ल जे मूड नियंत्रित करण्यास मदत करते. केळीसारख्या व्हिटॅमिन बी६ समृद्ध पदार्थांसह बदाम एकत्र केल्याने सेरोटोनिनचे उत्पादन वाढू शकते, जे नैसर्गिकरीत्या तुमचा मूड सुधारू शकते.
३. वजन कमी करण्यास मदत करू शकते – कमी कार्बोहायड्रेट सामग्री आणि प्रथिने व फायबरच्या उच्च पातळीसह बदाम तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करतात. ते भूक कमी करण्यासाठी मदत करतात.
४. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात – बत्रा असेही नमूद करतात की, बदाम रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतात. ते इन्सुलिन प्रतिसादास समर्थन देतात, ज्यामुळे ते मधुमेह किंवा मधुमेहापूर्वीचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरतात.
५. आतड्यांच्या आरोग्यास मदत करते – बदाम पचन सुधारण्यास मदत करते.
बदामाची साल इतकी पौष्टिक का आहे? बदामाची साल ही फक्त एक आवरण नाही, तर या सालीमध्ये पॉलीफेनॉल असतात; एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट, जो जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतो. ते व्हिटॅमिन ईदेखील देते, जे त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारक आरोग्यासाठी ओळखले जाते आणि पचनास मदत करते. पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांच्या मते, भिजवलेले बदाम सोलणे ही एक मोठी चूक असू शकते. तपकिरी रंगाची साल पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ई आणि आहारातील फायबरने समृद्ध असते – या सर्वांचे आरोग्यासाठी फायदे सिद्ध झाले आहेत.
महाजन म्हणतात, “बदाम असेच खाल्ल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास, आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि जळजळ कमी होण्यास मोठी मदत होते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बदाम भिजवाल तेव्हा ते जसेच्या तसे खा. बदामाच्या साली पचनक्रियेवर परिणाम करतात का? एक सामान्य समज असा आहे की, बदामाच्या साली पचायला जड असतात – आणि म्हणूनच बरेच लोक त्या काढून टाकतात. परंतु, बहुतेक निरोगी व्यक्तींमध्ये, सालीमधील फायबर आतड्यांच्या हालचालींना चालना देऊन आणि आतड्यांतील फायदेशीर बॅक्टेरियांना चालना देऊन पचनास मदत करू शकते.
बदाम भिजवल्याशिवाय खाऊ शकता का? हो, पण भिजवल्याने ते मऊ होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण थोडे सुधारू शकते. दरम्यान, भिजवलेले असो वा कच्चे, सालीसकट खाल्ल्याने तुम्हाला बदामाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. भिजवून नंतर सोलून काढल्याने? तिथूनच पोषण कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे बदामाची साल काढून बदाम खाऊ नयेत, तर सालीसकट बदाम खावेत.