How to Clean Kitchen Exhaust Fan: घरातील स्वयंपाकघर हे केवळ स्वयंपाकाचं ठिकाण नाही, तर ते संपूर्ण घराचा सुवास आणि स्वच्छतेचं प्रतीक मानलं जातं. पण, तेथे सतत काही ना काही निमित्ताने सातत्याने तळण्याची कामे होत असतात. त्यामुळे तेलकट वाफा आणि धुरामुळे एक्झॉस्ट फॅन हळूहळू काळपट आणि चिकट होत जातो. एकदा त्यावरील चिकटपणा वाढला की, मग त्याची साफसफाई करणे म्हणजे घरातील सर्वांत अवघड काम. कारण- फॅन काढणे, धुणे व पुन्हा तो बसवणे हा सगळा प्रकार अगदी डोकेदुखी वाढवणारा ठरतो.

पण, आता काळजीचं काही कारण नाही. कारण- एक कंटेंट क्रिएटर प्रिया शर्मा यांनी असा भन्नाट उपाय सांगितला आहे की, ज्यामुळे एक्झॉस्ट फॅन न उघडता, फक्त पाच मिनिटांत तो चकचकीत करता येणार आहे. ऐकूनच धक्का बसलाय ना? अगदी बरोबर! पण, हा जादुई उपाय इतका सोपा आहे की, प्रत्येकाला तो करून बघावासा वाटेल.

काय आहे त्या स्वच्छतेमागचं इंगित?

या ट्रिकमध्ये सगळ्यात आधी उपयोग होतो तो एका पांढऱ्या पावडरचा. ही पावडर साधीसुधी नाही, तर किचनमध्ये नेहमीच ठेवलं जाणारं ते ‘गुपित क्लीनर’ आहे. तिच्या दाणेदार रचनेमुळे चिकट थर पटकन निघून जातो. एवढंच नव्हे, तर वास घालवून ताजेपणा आणण्याचं सामर्थ्यही त्यात आहे.

पेस्ट तयार करण्याची प्रक्रिया

या जादुई पावडरसोबत दोन साध्या, पण जबरदस्त वस्तू मिसळल्या जातात. छोट्या वाटीत पावडर घेऊन, त्यात काही थेंब द्रवपदार्थ टाकायचे आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करायची. ही पेस्ट तयार होताच तिची ताकद अनेक पटींनी वाढते.

फॅन न काढताच सफाई कशी कराल?

१. सर्वांत आधी फॅनचा स्विच बंद करा.
२. टूथब्रशवर ही पेस्ट घ्या आणि फॅनची जाळी, पंखे व फ्रेमवर नीट लावा.
३. पूर्ण फॅन पेस्टने झाकला गेला की, त्याला ५ मिनिटे तसेच राहू द्या.
४. वेळ झाल्यावर ओल्या कपड्याने हळूहळू पुसून टाका.
५. चिकट मळ पेस्टसोबत सहज निघून जाईल. शेवटी फॅन कोरड्या कपड्याने पुसून चमकवा.

या उपायाचा खरा फायदा

या पद्धतीत तुम्हाला फॅन काढायची गरज नसल्यामुळे वेळेचीही बचत होते. स्वयंपाकघरामधील चिकटपणामुळे वाटणारा अस्वस्थततेचा त्रास कमी होतो आणि तुमचा एक्झॉस्ट फॅन अगदी नव्यासारखा दिसतो.

‘या’ जादुई उपायासाठी नेमकं साहित्य काय?

किती वेळ तुम्हाला उत्सुकता ताणली गेली असेल ना, “या दोन वस्तू नक्की कोणत्या?” त्या वस्तू म्हणजे लिक्विड डिशवॉश आणि पाणी! आणि पांढरी जादुई पावडर म्हणजे आपल्या घराघरात असणारा बेकिंग सोडा.

फक्त एवढं करून बघा आणि तुमचा एक्झॉस्ट फॅन ५ मिनिटांत चमचमत असल्याचे पाहून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल!

येथे पाहा व्हिडीओ