अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने इबोलावर एको लशीला गुरुवारी मान्यता दिली असून ती मर्क या कंपनीने तयार केली आहे. अमेरिकेत या रोगावर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेली ही पहिलीच लस आहे. ‘एरव्हेबो’ असे लशीचे नाव असून त्यामुळे झैरे इबोलो विषाणूंपासून संरक्षण मिळते. या विषाणूंपासून हा रोग होतो. इबोला प्रसारास हे विषाणू प्रामुख्याने कारणीभूत असतात. काँगोमध्ये सध्या इबोलाची जी साथ सुरू आहे त्यात या विषाणूंचे अस्तित्व दिसून आले आहे.
Video : मल्लिकाच्या ‘त्या’ मादक कृतीमुळे सलमानही लाजला
अक्षयने पत्नीला दिलं आजवरचं सर्वात महागडं गिफ्ट, पाहा फोटो
युरोपीय समुदायाने या लशीला ११ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली होती. एफडीएच्या सेंटर फॉर बायोलॉजिक्स इव्हॅल्युएशन अँड रीसर्च या संस्थेने म्हटले आहे की, या लशीने इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. जैवदहशतवादाच्या हल्ल्याच्या भीतीने अमेरिकेत या लशीची उपलब्धता आधीच होती फक्त त्याला मान्यता मात्र आता देण्यात आली आहे. गावी नावाची दुसरी एक लस असून त्याच्या पाच लाख मात्रा साठवून ठेवण्यात आल्या आहेत. मर्कची लस एकाच मात्रेत द्यायची असून त्यातून या रोगाविरोधात प्रतिबंध तयार होतो. दहा दिवसात या रोगापासून संरक्षण मिळते. १९९० पासून येल विद्यापीठात लस तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जॉन जॅक रोझ यांनी विषाणूंचे रूपांतर वेगळ्या स्वरूपात करून त्याचा लशीसाठी वापर केला होता. इ. स. २००० मध्ये कॅनडाच्या नॅशनल मायक्रोबायॉलॉजी लॅबोरेटरी या संस्थेने डॉ. हेन्झ फेल्डमन यांच्या नेतृत्वाखाली लस तयार केली होती. त्यात इबोला प्रथिनाचा संबंध होता.
“शेवटची अंघोळ कधी केली आठवत नाही”, अभिनेत्रीचा अजब दावा
लशीच्या चाचण्या उत्तर अमेरिका, आफ्रिका, युरोपात करण्यात आल्या असून पश्चिम आफ्रिकेतील देशातही ही लस वापरण्यात आली होती. एरव्हेबो ही लस आतापर्यंत २,५८,००० लोकांना देण्यात आली असून ती प्रभावी ठरली आहे. आतापर्यंत ३३५० जणांना रोगाची लागण झाली होती त्यातील २२२० लोक मरण पावले होते.