रात्रभर शांततापूर्वक झोपल्यानंतर काही लोकांना सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो, ज्यामुळे आरोग्यास समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत वेळेत आपण या समस्येपासून मुक्त होणे चांगले. जर तुम्हालासुद्धा सकाळी थकल्यासारखे वाटत असेल तर जाणून घ्या या समस्येपासून मुक्त कसे व्हाल. स्लीप एक्सपर्ट डॉ. मायकेल ब्रूस यांनी त्यांच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सुस्त आणि थकवा येण्याची कारणे स्पष्ट केली आहेत. जाणून घ्या कारणे…

चुकीच्या वेळी झोप घेणे

जर रात्रभर गाढ झोप होऊनसुद्धा सकाळी उठल्या उठल्या थकवा जाणवत असेल, तर लक्षात ठेवा तुमची जीवनशैली वेगळी आहे, ज्यामध्ये काही लोकांना लवकर झोपायला आवडते तर काहींना रात्रभर जागे राहणे आवडते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रोजच्यापेक्षा वेगळ्या वेळी उठलात तर तुम्हाला सुस्त वाटू शकते.

बराच वेळ अंथरुणावर पडून असणे

रात्रभर गाढ झोप झाल्यानंतर जेव्हा सकाळी सकाळी पहिली जाग येते, तेव्हा अनेकांना अंथरुणात लोळत राहावंसं वाटतं. बरेच लोक सकाळी उठण्याच्या प्रयत्नात डुलकी घेतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे.

आणखी वाचा : यूरिक अॅसिड वाढल्यास शरीर देऊ लागते संकेत; गंभीर आजार होण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय

बेडरूमचे वातावरण

खोलीचे तापमान तुमच्या झोपेच्या गुणवत्तेसाठी आवश्यक आहे, त्यामुळे आरामदायी झोपेसाठी एसी कूलिंग समायोजित करा. तुम्ही निळा दिवा वापरू शकता. कारण निळा प्रकाश मेलाटोनिनचे उत्पादन रोखेल, जे चांगल्या विश्रांतीसाठी आवश्यक आहे.

अल्कोहोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्कोहोल आणि कॅफिनपासून दूर राहा. हे तुम्हाला गाढ झोपेपासून दूर ठेवते, ज्यामुळे तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो. दुपारी २ वाजेपर्यंत कॅफिन बंद करा आणि झोपण्याच्या ३ तास आधी दारू पिणे बंद करा.