Fastest tricks to clean methi: हिवाळ्याच्या दिवसांत मेथीची भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे ज्यांना मेथीची भाजी खायला आवडते अशांच्या घरात आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी ही भाजी बनवली जाते. मेथीची सुकी भाजी, मेथी पराठा, मेथी पुरी असे विविध पदार्थ मेथीपासून बनवले जातात. पण, मेथीची भाजी बनवायला जितका वेळ लागत नाही, त्याहून अधिक वेळ मेथीची भाजी साफ करायला लागतो. त्यामुळे अनेक जण ही भाजी घरी आणायचाच कंटाळा करतात. तुम्हालाही मेथीची भाजी साफ करण्याचा कंटाळा येत असेल, तर टेन्शन सोडा आणि मेथीची भाजी साफ करण्याची ही सोपी ट्रिक फॉलो करा

मेथीची भाजी साफ करण्याच्या चार पायऱ्या

पहिली पायरी

सर्वप्रथम मेथीची जुडी हातात धरून, धारदार चाकूच्या साह्याने मागील बाजूचे जाड देठ कापून घ्या. हे करताना जाड देठाबरोबर काही मेथीची पानेही बाहेर येण्याची शक्यता असते. तुम्ही ती नीट व्यवस्थित लावून घेऊ शकता आणि नंतरसाठी बाजूला ठेवू शकता.

दुसरी पायरी

त्यानंतर मेथीची जुडी उघडा आणि त्याच्या अनेक लहान लहान जुड्या बनवा. आता पुढील काही पाने हाताने काढून टाका आणि पुन्हा एकदा जाड देठ कापून घ्या. त्यानंतर चाकूच्या मदतीने राहिलेले देठ बारीक चिरून घ्या.

तिसरी पायरी

मेथीच्या भाजीच्या सर्व पानांच्या लहान जुड्या बारीक चिरून घेतल्यावर आता जाड देठाला चिकटलेली पाने काढून टाका. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. हे करताना काळी किंवा पिवळी पाने दिसल्यास ती घेऊ नका.

चौथी पायरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या पायरीमध्ये बारीक चिरलेल्या मेथीच्या पानांपासून माती काढण्यासाठी दोन ते तीन वेळा ती स्वच्छ पाण्याने धुवा. यावेळी त्यात मीठ घालायला विसरू नका. भाजी धुताना त्यात मीठ घातल्यास, त्यात सूक्ष्म अळ्या, जंतू असल्यास ते निघून जातात.