प्रत्येकाला आपली त्वचा अगदी मऊ, नितळ आणि कोणतेही डाग नसणारी हवी असते. त्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय करत असतात. मात्र त्याबरोबर बाहेरचे तेलकट, तुपकट, चमचमीत असे जंक फूडसुद्धा खात असतात. त्यामुळे अनेकदा आपल्या चेहऱ्यावर तेलकटपणा, मुरुमं-पिंपल येतात; त्वचेच्या सतत काहीतरी समस्या उद्भवत असतात. अशा गोष्टींवर, नेमका काय उपाय करायचा हे मात्र आपल्याला समजत नाही.

अनेक वर्षांपासून, विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून मनुष्य आपल्या त्वचेची काळजी घेत आला आहे. निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधी आणि गुणकारी घटकांचा वापर हा आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये केला जातो. आपल्या आरोग्यपासून ते केसांची, त्वचेची काळजी घेईपर्यंत आयुर्वेदिक घटक आपली मदत करत असतात. फक्त कोणती गोष्ट कशी वापरायची याची हे माहिती असणे आवश्यक असते. तुमच्या या पिंपल आणि मुरुमांच्या समस्या दूर करण्यासाठी, हे घरगुती परंतु, आयुर्वेदिक गोष्टींपासून बनवलेले उपाय पाहा.

Pimples
चेहऱ्यावरील पिंपल्सपासून होईल सुटका, फक्त हे पाच घरगुती उपाय करा
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”

हेही वाचा : Beauty tips : ‘या’ दहा सवयी घेतील तुमच्या त्वचेची योग्य काळजी; पाहा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या सोप्या टिप्स

चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येवर घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहा.

१. हळदीचा लेप

हळदीमध्ये शरीराला, त्वचेला पोषक आणि उपयुक्त असे अनेक घटक उपलब्ध असतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा इतर काही समस्या असल्यास हळद फायदेशीर ठरू शकते. हळदीमधील अँटीइंफ्लेमेट्री घटक चेहऱ्यावरील उष्णता, जळजळ कमी करून त्वचेला आराम देते. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एक लेखावरून समजते.

वापर- थोड्याश्या मधात किंवा पाण्यासोबत हळद मिसळून एक लेप बनवून घ्या आणि १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. पंधरा मिनिटानंतर, चेहरा पाण्याने धुवून घ्या.

२. कडुनिंबाची पाने

कडूनिंब हे आपल्या शरीरासाठी खूपच औषधी असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल घटक उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला जर मुरुमांचा म्हणजेच पिंपल्सचा त्रास असेल तर या पानांचा उपयोग होऊ शकतो. या पानांच्या मदतीने स्वच्छ होण्यास मदत होऊन, त्यावरील आग, जळजळ कमी करण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील जीवजंतू नाहीसे करते.

वापर- कडुनिंबाची पाने वाटून त्याची एक पेस्ट बनवून घ्या आणि चेहऱ्यावर मुरूम असणाऱ्या भागावर लावा.

हेही वाचा : Skin care tips : चेहरा दिसेल चमकदार अन उजळ; चहाचा ‘अशा’ पद्धतीने करून पाहा वापर…

३. कोरफड

त्वचेला थंडावा आणि आराम देण्यासाठी कोरफड वापरली जाते. चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कोरफड लावल्याने त्वचेची आग, जळजळ, लालसर त्वचा या सर्वांना थंडावा देण्याचे काम ती करत असते. तसेच चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठीसुद्धा कोरफडीचा गर मदत करतो.

वापर- कोरफडीचा गर काढून चेहऱ्यावर मुरुमं असणाऱ्या भागांवर थेट लावून ठेवा.

४. त्रिफळा पावडर

आयुर्वेदामध्ये त्रिफळाचा वापर अधिकप्रमाणात होत असतो. याचा उपयोग आपल्या संपूर्ण उत्तम आरोग्यासाठी केला जातो. त्रिफळा चेहऱ्यावर लावल्याने, त्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स, आपल्या चेहऱ्याला तजेला देण्यास उपयुक्त ठरतात.

वापर- त्रिफळाची पावडर थोड्या पाण्यात मिसळून त्याचा एक लेप तयार करा. हा लेप आपल्या चेहऱ्यावर किंवा मुरूम असलेल्या भागांवर लावून ठेवा. लेप वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

५. चंदनाची पावडर

चंदनाचा लेप लावल्याने आपल्या त्वचेला प्रचंड थंडावा मिळतो. त्यामुळे आपोआपच चेहऱ्यावरील लाली किंवा उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होण्यास चंदनाची पावडर मदत करू शकते. त्वचेची होणारी चिडचिड किंवा जळजळ घालवून त्वचा शांत आणि तजेलदार दिसण्यासाठी याचा वापर कसा करायचा ते पहा.

वापर- चंदनाची पावडर थोडयाश्या पाण्यात मिसळून त्याचा एक लेप बनवून घ्या. संपूर्ण चेहऱ्यावर किंवा तुम्हाला जिथे मुरुमं असतील त्याठिकाणी लावून ठेवा. लेप वाळल्यानंतर, कोमटसर पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधिरीत असल्याने कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]