scorecardresearch

पुन्हा येणार Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल, स्मार्टफोन्ससह अनेक उत्पादनांवर असेल मोठी सूट

फ्लिपकार्टच्या या सेलच्या तारखेबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा सेल…

पुन्हा येणार Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल, स्मार्टफोन्ससह अनेक उत्पादनांवर असेल मोठी सूट
खरंतर फ्लिपकार्टने याआधी देखील नुकतंच बिग सेव्हिंग डेज सेलचं आयोजन केलं होतं. आता हाच सेल पुन्हा आणण्यात आला आहे. (Photo : Flipkart)

फ्लिपकार्टने (Flipkart ) आता पुन्हा आपल्या ‘बिग सेव्हिंग डेज’ (Big Saving Days) सेलची घोषणा केली आहे. दरम्यान, या सेलच्या तारखेबद्दल फ्लिपकार्टकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरीही ‘लवकरच’ असं म्हणत या सेलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, निश्चितच ग्राहकांची उत्सुकता देखील वाढली आहे. या सेलमध्ये अर्थातच फ्लिपकार्ट विविध उत्पादनांवर तसेच विशिष्ट बँक कार्ड धारकांना अतिरिक्त सूट देणार आहे. फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये अ‍ॅक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डधारकांना या सेलदरम्यान १०% अतिरिक्त सूट मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या सेलमध्ये ग्राहकांना नेमक्या कोणकोणत्या वस्तूंच्या खरेदीवर किती फायदा मिळू शकतो? पाहुया

खरंतर फ्लिपकार्टने याआधी देखील नुकतंच बिग सेव्हिंग डेज सेलचं आयोजन केलं होतं. आता हाच सेल पुन्हा आणण्यात आला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टने यासंदर्भात जरी अधिकृतपणे अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नसली तरीही मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टचा हा बिग सेव्हिंग डेज सेल ६ ऑगस्टपासून सुरू होईल आणि १० ऑगस्टपर्यंत असेल अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट प्लस सदस्य यातील डील्समध्ये २४ तासांपूर्वीच एक्सेस करू शकतील.

‘सेल’साठी तयार केली एक मायक्रोसाईट

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजच्या सेलसंदर्भात एक मायक्रोसाईट देखील तयार करण्यात आली असल्याचं म्हटलं जातं. या मायक्रोसाईटनुसार, यात क्रेझी डील्ससारखे विशेष झोन्सदेखील असतील. ते रात्री १२, सकाळी ८ आणि संध्याकाळी ४ वाजता रिफ्रेश होतील. या व्यतिरिक्त, इतर झोन्समध्ये रश अवर्स आणि टिकटॉक डील्सचा देखील समावेश आहे. यासोबतच, यामध्ये ‘बाय मोअर, सेव्ह मोअर’ ऑफरमध्ये सूट देण्यासह अतिरिक्त मोफत उत्पादनं देखील दिली जाऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर तब्बल ८० टक्क्यांपर्यंत सूट

फ्लिपकार्ट या दरम्यान मोबाईल आणि टॅब्लेटवर ऑफर देईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर देखील ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. तर टीव्ही आणि अप्लायन्सेसवर ७५ टक्क्यांपर्यंतची सूट कंपनीकडून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याचसोबत या फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये कपड्यांवर देखील ८० टक्क्यांची सूट मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या