Natural Liver Detox Drink: तुम्हाला वारंवार थकवा जाणवतोय का? पोट साफ होत नाही, पचन व्यवस्थित होत नाही, असं वाटतंय का? तर मग सावध व्हा! कारण- या सगळ्यामागे लपलेला खरा गुन्हेगार म्हणजे तुमचं यकृत असू शकतं. यकृत हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा अवयव. तो शरीरातून घातक टॉक्सिन्स (विषारी घटक, अपायकारक द्रव्ये) बाहेर काढतो, पण जर यकृतच उत्सर्जित घटकांनी भरलं तर? मग थकवा, अपचन, पोट बिघडणे आणि अनेक आजारांना सुरुवात होऊ शकते. पण काळजी करू नका, यावर आहे एक जबरदस्त घरगुती गुप्त उपाय – ज्याचं नाव ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.
थकवा घालवणारा ‘तोच’ उपाय
संशोधन सांगतं की, आपल्या स्वयंपाकघरात नेहमी सापडणाऱ्या आले आणि पुदिना यांच्या पाण्याने यकृतातील सगळे विषाक्त वा उत्सर्जित करावयाचे घटक सहज बाहेर निघून जाऊ शकतात. ऐकायला साधं वाटेल; पण परिणाम? अफलातून!
आल्याचे गुणधर्म – त्यामध्ये जिंजरोल आणि शोगोल यांसारखे बायोअॅक्टिव्ह घटक असतात. ते यकृतामधली सूज कमी करतात, पचन सुधारतात व हानिकारक पदार्थ बाहेर टाकतात.
पुदिन्याचे फायदे – पुदिन्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. पुदिना पचनक्रियेला मदत करतो. पुदिन्याच्या सेवनाने यकृताच्या पचन प्रक्रियेस मदत मिळते.
रोज प्या आणि चांगली अनुभूती मिळवा
सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही एक ग्लास आलं–पुदिन्याचं पाणी प्यायलात, तर परिणाम पाहून तुम्हाला स्वतःच आयुष्यात काहीतरी चांगला बदल झाल्याची अनुभूती मिळेल.
यकृतातील सगळी घाण बाहेर काढतो
- आलं आणि पुदिना हे दोन्ही पचनासाठी रामबाण मानले जातात. पचन नीट झालं की, यकृतावरचं ओझं कमी होतं आणि ते डिटॉक्सवर लक्ष केंद्रित करू शकतं.
- आल्यातील उष्ण गुण (Thermogenic property) मेटाबॉलिझम वाढवतात. त्यामुळे कॅलरीज जळतात, वजन कमी होण्यास मदत होते आणि यकृताची कार्यक्षमता टिकून राहते.
- या दोन्ही घटकांमध्ये अँटिऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वं आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे लहानसहान आजार दूर राहतात. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते
बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य :
- १ इंच आल्याचा तुकडा
- पुदिन्याची १०-१५ ताजी पाने
- १ ग्लास पाणी
- आवडीनुसार अर्ध्या लिंबाचा रस व चिमूटभर काळे मीठ
पाणी उकळा, त्यात आले-पुदिना टाका. मग ते पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. त्यात लिंबू आणि मीठ मिसळा. झाले तयार तुमचे आरोग्यवर्धक पेय.
मंडळी, थकवा, पचनाचे त्रास आणि यकृतामध्ये जमलेली सगळी घाण साफ करण्यासाठी हा चमत्कारी उपाय म्हणजे ‘आले आणि पुदिन्याचे पाणी’. साधा दिसणारे हे पेय तुमच्या आरोग्याला देईल नवा टर्निंग पॉइंट!