Which Vegetables Is Not Good For Piles : मूळव्याध ही एक अतिशय वेदनादायक समस्या आहे, ज्यामध्ये गुदद्वाराजवळ सूज येते, जळजळ होते आणि कधीकधी गुदद्वारातून रक्तस्त्रावदेखील होतो. यामुळे मूळव्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे मूळव्याधीची समस्या आणखी वाढू शकते. काही भाज्या अशा आहेत, ज्या खाल्ल्यास बद्धकोष्ठता किंवा गॅस होऊ शकतो, ज्यामुळे मूळव्याधीची समस्या वाढू शकते. आयुर्वेदिक आणि युनानी औषधतज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी अशा पाच भाज्यांबद्दल सांगितले आहे, ज्या मूळव्याधीच्या रुग्णांनी खाणं टाळलं पाहिजे. जर या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर मूळव्याधीची समस्या वाढू शकते.

डॉ. सलीम झैदी म्हणाले की, भाज्या खाणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते, परंतु आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमध्ये काही भाज्या खाऊ नयेत, कारण त्यामुळे आरोग्य स्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्याचप्रमाणे मूळव्याधीच्या रुग्णांनीही काही भाज्या खाणे टाळावे.

मूळव्याधीचा खरा शत्रू बद्धकोष्ठता आहे. जर पोट व्यवस्थित साफ झाले नाही किंवा शौचास खूप कडक होत असेल आणि शौचास बसल्यानंतर जोर करावा लागला तर मूळव्याधीची समस्या वाढू लागते.

मुळव्याधाचा त्रास असेल तर चुकून खाऊ नका ‘या’ ५ भाज्या (These 5 Vegetables Avoid If You Are Suffering From Piles)

१) वांगी

मुळव्याधीमध्ये वांग्याचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. वांग्यामुळे पित्त आणि वात दोष वाढू शकतात. वांग्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते आणि त्यामुळे मूळव्याधीची समस्या वाढू शकते. वांग्यामध्ये असलेले काही घटक गॅस, आम्लता आणि पचनाशी संबंधित समस्या वाढवू शकतात, ज्यामुळे शौचास जाताना जळजळ किंवा वेदना वाढू शकतात.

२) कच्चा कांदा

कच्चा कांदा हा खूप उष्ण असतो, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. मूळव्याधीच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात कांद्याचे सेवन करावे. जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने गुदद्वारात जळजळ आणि खाज वाढू शकते. मल कडक होऊ शकतो, ज्यामुळे मूळव्याधीची समस्या वाढू शकते.

३) अरबीची भाजी

अरबीच्या भाजीमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते, जे पचण्यास कठीण असते. अशावेळी अरबीचे जास्त सेवन केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे गुदद्वाराजवळ सूज आणि वेदना वाढू शकतात.

४) कोबी

मूळव्याधीच्या रुग्णांनी फुलकोबीचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. फुलकोबीमुळे गॅस आणि पचनासंबंधित समस्या वाढू शकतात. पोटात खूप गॅस तयार होतो, ज्यामुळे शौचास बसताना गुदद्वाराच्या नसांवर दाब पडतो, ज्यामुळे वेदना आणि सूज वाढते. याशिवाय कोबीची भाजी योग्यरित्या स्वच्छ करून नीट शिजवली नाही तर संसर्ग वाढू शकतो.

५) कच्चा पालक

पालकामध्ये भरपूर फायबर असते, परंतु कच्च्या पालकामुळे गॅस आणि अपचनाची समस्या वाढू शकते. मूळव्याधीचा त्रास असताना पालक खाल्ल्यास पोट नीट साफ होत नाही आणि आतड्यांसंबंधित त्रास जाणवतो, तीव्र वेदना होतात; त्यामुळे पालक खायचा झाल्यास तो नीट शिजवून ताकाबरोबर खाणं फायदेशीर मानलं जातं. कच्चा पालक खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे मूळव्याधीची समस्या वाढू शकते.