Bloating Problem:  सध्याच्या काळातील चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोट फुगण्याची समस्या असते तेव्हा गॅस तयार होणे, पोट दुखणे, अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे दिसतात.


अशा वेळी माणसाने थोडी काळजी घेतली तर या समस्येवर लवकर मात करता येते. आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते. त्या गोष्टींबद्दल जाणून घ्या

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

या पदार्थांपासून दूर रहा

  1. ब्रोकोली– जर तुम्हाला फुगण्याची समस्या असेल तर ब्रोकोलीचे सेवन करू नका. पोटाला ब्रोकोली पचण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते.
  2. सफरचंद– जर एखाद्याला पोट फुगण्याची समस्या असेल तर सफरचंदाचा आहारात समावेश करू नका. कारण सफरचंद फायबरचा समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे केवळ गॅसची समस्याच नाही तर ब्लोटिंगची समस्या आणि वेदना देखील होऊ शकतात.
  3. लसूण– लसूण पोट फुगण्याची समस्या देखील वाढवू शकतो. यामध्ये फ्रक्टन्स आढळतात, ज्यामुळे ब्लॉटिंगची समस्या आणखी वाढू शकते.
  4. बीन्स– बीन्सच्या सेवनाने पोट फुगण्याची समस्या वाढू शकते. अशा स्थितीत पोट फुगण्याची समस्या असली तर व्यक्तीने याचे सेवन करू नये. बीन्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे केवळ डायरियाची समस्याच उद्भवत नाही तर पोट फुगणे आणि पोटदुखीच्या समस्येला देखील सामोरे जाऊ शकते.