Six Best Foods That Give You Energy : काम करताना पाहिजे तसा रिझल्ट येत नाही आणि मग चिडचिड होऊ लागते, ताण येऊ लागतो आणि मग तुम्ही विचार करून थकून जाता. यामुळे तुमचे मन कामात लक्ष केंद्रित करण्यास नकार देते, तर शरीर नेहमीपेक्षा जड वाटू लागते. यावर तात्पुरता उपाय करण्यासाठी अनेक जण चहा, कॉफीचे सेवन करतात. पण, प्रामाणिकपणे सांगायचे तर, त्या क्षणाला तुमच्या शरीराला खरोखर आराम, संतुलन आणि पोषणाची जास्त गरज असते.

अन्न किंवा एखादा पदार्थ तुमच्या ऑफिसच्या अडचणी तर दूर करू शकत नाही. पण, या सर्व प्रक्रियेत लागणारी मेंदू आणि ऊर्जेची गरज तुम्हाला नक्की देऊ शकतो. म्हणून अशावेळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी तुमच्या ताण, थकव्याला पौष्टिक पदार्थ खाऊन दूर करा. दररोज पुढील सहा पदार्थ खल्लास तुमचा उत्साह वाढेल आणि लक्ष केंद्रित करण्यात तुम्हाला मदत होईल.

जेव्हा तुम्हाला राग येईल, चिडचिड होईल तेव्हा पुढील ६ पदार्थ खा…

१. ओट्स

ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे हळूहळू तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. यामुळे रक्तातील साखर स्थिर करण्यास आणि उर्जेतील येणारी बाधा टाळण्यास मदत होते. ओट्स बी1 सारख्या बी जीवनसत्त्वांचा देखील चांगला स्रोत आहे, जे ऊर्जा देण्यास आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्वाचे असतात . २०२२ च्या एका संशोधनानुसार, ओट्समध्ये मॅग्नेशियम असते, जे एक महत्त्वाचे खनिज आहे; ज्यामुळे ताण व चिडचिड कमी होते.

२. केळ

केळी या फळामुळे ऊर्जा मिळते. केळीमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारख्या नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे तुमच्या ऊर्जेची पातळी लवकर वाढते. पण, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते; ज्यामुळे तुमचा तणाव सुद्धा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे फक्त एक केळ तुमची ऊर्जा परत आणण्यास, स्नायूंना आराम देण्यात आणि मूड नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

३. डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटच्या एका छोट्याश्या तुकड्यात ७० टक्के कोको असतो; जो तुमचा मूड चांगला करण्यात मदत करू शकतो. तर २०२२ च्या संशोधनानुसार डार्क चॉकलेट खाल्याने एंडोर्फिनचे प्रकाशन उत्तेजित होते. कारण यामध्ये तणाव कमी करणारे संयुगे असतात. शिवाय, मिल्क चॉकलेटच्या विपरीत, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी असते आणि त्यात मॅग्नेशियम असते, जे मज्जासंस्थेला आधार देण्यास मदत करते.

४. नारळाचे पाणी

जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन होऊ लागते. त्यामुळे नारळपाणी हा एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पेयासारखे आहे; जो कृत्रिम साखरेशिवाय तुम्हाला फ्रेश ठेवण्यात मदत करतो. पोटॅशियमची कमतरता तुमचा मूड खराब करू शकते. इतर पेयांपेक्षा नारळपाणी तुम्हाला तुम्हाला आतून थंड होण्यास मदत करू शकतात. त्यामुळे फ्रिजमध्ये बाटली थंड करून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ती प्या.

५. अंडी

अंडी बनवायला सोपी आणि पचायला हलकी असतात. अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात; जी तुमच्या मेंदूला आणि शरीराला चिडचिड किंवा ताण आल्यावर आवश्यक असतात. अंड्यांमध्ये बी जीवनसत्त्वे, विशेषतः बी१२, भरपूर प्रमाणात असतात, जे ऊर्जा चयापचय, मेंदूच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशावेळी उकडलेले किंवा साधे ऑम्लेट किंवा अंडी शिजवून खाण्यासाठी उत्तम असू शकतात जेव्हा तुम्हाला कमी आणि थकवा जाणवत असेल.

६. योगर्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथिने आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले योगर्ट तणाव येत असेल नक्की खावे. योगर्टमध्ये असणारी प्रथिने तुम्हाला पोट भरण्यास आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. शिवाय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण शांत मज्जासंस्थेला आधार देते. अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक गोडवा यासाठी एक चमचा मध किंवा मूठभर बेरी तुम्ही त्यात घालू शकता. पचनास हलके योगर्ट मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत असताना खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.