फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिष नॉस्ट्राडेमस हे त्यांच्या भविष्यातील घटनांच्या भाकितामुळे प्रसिद्ध आहेत. नॉस्ट्राडेमस यांनी ६,३३८ भाकितं केली आहेत. जगाचं शेवट कधी आणि कसा होणार याबाबतही त्यांनी लिहिलं आहे. हिटलरचं राज्य, दुसरं महायुद्ध, ९/११ दहशतवादी हल्ला, फ्रान्स क्रांती यासारख्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला होता. नॉस्ट्राडेमस यांचं निधन २ जुलै १५६६ झालं होतं. काही शतकांपूर्व त्यांनी वर्तवलेली भाकितं काही प्रमाणात खरी ठरत असल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसायला लागला आहे. इतकं वर्ष उलटूनही त्यांच्या भविष्यवाणीची चर्चा आहे. नवं वर्ष २०२२ बद्दलही त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत.

  • किम जोंग उन मरणार? : नॉस्ट्राडेमस यांनी या वर्षात प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्तीचा मृत्यूचं भाकित वर्तवलं आहे. सेंचुरियाच्या १४ व्या उताऱ्यात लिहिलं आहे की, “एका शक्तिशाली व्यक्तीच्या मृत्यूने बदल होईल. देशात नवा चेहरा समोर येईल.” नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे या भाकीताचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीशी याबाबतचं भाकित जोडलं जात आहे.
  • भूकंप : नॉस्ट्राडेमस यांच्या सेंचुरिया तीनच्या तिसऱ्या उताऱ्यात या वर्षी जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा भूकंप दिवसा आल्यास भयानक स्थिती असेल. तसेच यामुळे अनेकांचा मृत्यू होईल.
  • महागाईला सामोरे जावे लागेल : नॉस्टाडेमस यांच्या भाकितावर विश्वास ठेवला तर पुढच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेत खूप बदल होणार आहेत. पुढील वर्षी बिटकॉइन आणि सोने-चांदी ही मालमत्ता मानली जाईल. अमेरिकन डॉलरमध्ये मोठी घसरण होईल. जगात महागाई खूप वाढेल, त्यामुळे लाखो गरिबांना उपासमारीने आपला जीव गमवावा लागेल.
  • युरोपमध्ये युद्ध : नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाणीनुसार युरोपमध्ये युद्धाचे संकेत देण्यात आले आहेत. याचा संदर्भ पॅरिस संबंधित आहे. भविष्यबाबत विश्लेषण करणाऱ्यांनी युरोपात युद्धजन्य स्थिती निर्माण होईल असं सांगितलं आहे. यापूर्वी करोनामुळे फ्रान्सच्या राजधानीत अराजकता निर्माण झाली होती. तर २०१५ मध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता.

Astrology: कुंडलीत चांडाळ योग असेल तर पदरी पडते निराशा; जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील उपाय

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
  • युरोपियन संघाचं पतन : नॉस्ट्राडेमसच्या मते, ब्रेक्झिट ही फक्त सुरुवात होती. २०२२ मध्ये संपूर्ण युरोपियन युनियन कोसळणार आहे. मात्र ही भविष्यवाणी खरी ठरते का? येत्या काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.
  • उल्का पृथ्वीवर धडकणार : नॉस्ट्राडेमसच्या भाकितानुसार २०२२ मध्ये पृथ्वीवर मोठी उल्का धडकणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. यामुले मोठा मोठा विध्वंस होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र नासा या अंतराळ संशोधन संस्थेने असं कोणतंच संकट नसल्याचं सांगितलं आहे.
  • रोबोटचा दबदबा : नॉस्ट्राडेमसच्या भाकितात २०२२ या वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा उल्लेख आहे. मानव जातीवर आता रोबोटचा ताबा असेल असं विश्लेषकांनी मत मांडलं आहे. मोठ्या प्रमाणात संगणीकृत झाल्याने मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याचं गेल्या काही वर्षात पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वी रोबोटच तयार करणार रोबोट अशीही बातमी होती. त्यामुळे याकडेही विश्लेषकांचं लक्ष लागून आहे.