वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ योग असतात. तेव्हा त्याला प्रयत्न करूनही हाती हवं तसं यश मिळत नाही. नोकरी-व्यवसायात अडचणी येत राहतात. जवळच्या लोकांशी संबंध बिघडतात. जर कुंडलीत शुभ फलांची संख्या जास्त असेल तर सामान्य परिस्थितीतही जन्मलेली व्यक्ती श्रीमंत, सुखी आणि पराक्रमी बनतो. पण अशुभ योग बलवान असल्यास व्यक्तीने लाख प्रयत्न केले, तरीही त्याची संकटं कमी होत नाही.

ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योगांचं वर्णन केले आहे. आज आपण गुरु चांडाल योगाबद्दल जाणून घेणार आहोत. या योगाबद्दल ऐकून व्यक्तीच्या मनात भीती आणि चिंता निर्माण होते. मात्र फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्योतिषशास्त्रात याबाबत काही उपाय सांगितले आहेत. या उपायातून नकारात्मक प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करू शकता. कुंडलीतील कोणत्याही घरात राहूसोबत गुरु ग्रह स्थित असेल तर हा योग तयार होतो. ज्या घरामध्ये हा योग असतो त्या घराचे शुभ परिणाम कमी होतात. त्याच वेळी कुंडलीच्या वेगवेगळ्या घरांमध्ये त्याचा परिणाम थोडासा बदलतो. गुरू आणि राहु कोणत्या राशीत आहेत, त्याचबरोबर गुरू बलवान असेल तर हा योग कमकुवत होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होतो, तेव्हा ती व्यक्ती यशासाठी संघर्ष करत असते. पैशाची कमतरता पदोपदी जाणवते. व्यक्ती निराशा आणि नकारात्मकतेने वेढली जाते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

Shani Rashi Parivartan 2022: नव्या वर्षात शनिदेवांची चार राशींवर असेल कृपा, आर्थिक स्थितीत सुधार होण्याची शक्यता

चांडाळ योग प्रभाव कमी करण्याचे ज्योतिषशास्त्रातील उपाय

  • कपाळावर नियमित केसर, हळदी यांचा तिलक लावा
  • गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून पिवळ्या वस्तूंचे दान करा
  • आई वडील आणि गुरुजनांचा आदर करा
  • राहु मंत्राचा जप करा
  • गुरुवारी भगवान विष्णूंची उपासना करा
  • केळीचे रोप लावा आणि नियमित पूजा करा