तुम्ही अनेकदा पाहिले असे की जेव्हा तुमचा फ्रिजरमध्ये एखादे भांडे ठेवता तेव्हा ते चिकटून बसते आणि खूप प्रयत्न करूनही ते सहजसहजी निघत नाही. कित्येकदा फ्रिजरमध्ये बर्फ साचून साचून कडक होऊन जातो जो वितळवणे सोपे काम नसते. तुमच्यासह असे होत असेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे फ्रिजरमध्ये कोणतेही भांडे चिकटून बसणार नाही आणि बर्फ साचून कडकही होणार नाही.
तुम्हाला या समस्येतून सुटका देणारा उपाय जाणून घेऊ या…

तुम्हाला फ्रिजरमध्ये बर्फ होऊ नये म्हणून फक्त एक बटाटा वापराचा आहे. सोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये ही ट्रिक सांगितली आहे. इंस्टाग्रावर vardanpakwan या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही ट्रिक खूप काम करते असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा – फक्त एका बटाट्याने स्वच्छ करा आरसा; दोन मिनिटांमध्ये चमकेल नव्यासारखा!

फ्रिजरमध्ये बर्फ साचलेला बर्फ कसा काढावा?

  • सर्वात आधी एक बटाटा घ्या आणि त्याला दोन भागांमध्ये कापा
  • त्यानंतर कापलेला बटाट्याचे तुकडे करा आणि पुर्ण फ्रिजरमध्ये व्यवस्थित चोळून करा.
  • एकही कोपरा सुटणार नाही याची काळजी घ्या.

हेही वाचा – शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

ही सोपा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते असा दावा या व्हायरल व्हिडीओमध्ये केला आहे. यामुळे तुमच्या फ्रिजमध्ये बर्फ कडक होणार नाही आणि तुम्ही फ्रिजरमध्ये हवे ते सामान ठेवू शकता कारण ते बर्फामुळे चिकटणार नाही आणि सहज काढता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा उपाय काम करतो की हे स्वत: वापरून पाहा आणि परिणाम जाणून घ्या