Fridge Storage Hacks : रातील कोणताही पदार्थ कुजण्यापासून रोखण्यासाठी आणि बराच काळ तो साठविण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवले जातात; जेणेकरून ते पदार्थ लवकर खराब होत नाहीत. दुसरीकडे उन्हाळ्यात फ्रिजची फार गरज असते. कारण- त्या दिवसांत अन्नपदार्थ बाहेर ठेवल्यास लवकर खराब होतात. त्याशिवाय सुका मेवा, रवा, मैदा, कोल्ड्रिंक्स, पाणी, आइस्क्रीम अशा अनेक गोष्टी ठेवण्यासाठीही फ्रिजचा वापर केला जातो. पण, या वस्तूंमुळे फ्रिज खूप लवकर भरतो. अशा वेळी काही नवीन वस्तू ठेवायची झाल्यास जागात शिल्लक नसेत. अशा वेळी कशी तरी जागा करुन वस्तू एकावर एक कोंबून भरण्याचा प्रयत्न केला जातो. पण अनेकदा फ्रीज उघडताना त्या बाहेर पडतात.
तुम्हालाही फ्रिजमध्ये वस्तू ठेवताना ही समस्या जाणवत असेल, तर खालील स्मार्ट स्टोरेज हॅक्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. त्यांच्या मदतीने तुम्ही फ्रिजमध्ये अनेक वस्तू व्यवस्थित ठेवू शकता. त्यामुळे तुमचा फ्रिजही चांगल्या स्थितीत राहील आणि त्यातील कोणत्याही वस्तू तुम्हाला सहजगत्या मिळतील.
१) कंटेनरचा वापर करा
जर तुम्ही फ्रिजमध्ये ताक पॅकेट, उरलेले दूध, ज्यूस अशा वस्तू ठेवत असाल, तर त्यासाठी जास्त जागा लागते. तुम्ही या गोष्टी साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या वापरू शकता. त्यामुळे हे पदार्थ सांडतही नाहीत आणि ते साठवण्यासाठीही कमी जागा लागेल. काचेच्या बाटल्यांमध्ये हे पदार्थ ठेवल्यास तुम्हाला ते सहजपणे मिळू शकतील.
२) स्टॅकिंग बास्केट वापरा
आजकाल बाजारात स्टॅकिंग बास्केट उपलब्ध आहेत. तुम्ही त्या फ्रिजच्या प्लेट्सवर हँग करू शकता. त्यामुळे फ्रिजमध्ये वस्तू एकाच ठिकाणी ठेवता येतात. तुम्ही या बास्केटमध्ये कोणत्याही भाज्या, फळे, डेअरी प्रॉडक्ट्स इत्यादी सहजपणे ठेवू शकता. त्यामुळे फ्रिज खूप व्यवस्थित दिसतो.
३) एअर टाइट कंटेनरचा वापर करा
आजकाल लोक मैदा, रवा, मसाले इत्यादी खराब होऊ नयेत म्हणून फ्रिजमध्ये ठेवताना दिसतात. या वस्तू तुम्ही एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवू शकता. अगदी कमी जागेत तुम्ही हे पदार्थ सुरक्षितपणे ठेवू शकता. बॉक्समध्ये वस्तू ठेवल्याने फ्रिज आतून टापटीप दिसतो. तुम्हाला हवे असल्यास या कंटेनरवर पदार्थाच्या नावाची स्लिपही लावू शकता.
४) नेटच्या पिशव्या वापरा
तुम्ही काकडी, टोमॅटो आणि इतर भाज्या आणि फळे फ्रिजमध्ये असेच एकत्र ठेवल्यास खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी बाजारात हल्ली रेडीमेड नेटच्या पिशव्या मिळतात, ज्यात तुम्ही सर्व भाज्या एकेक करून व्यवस्थित ठेवू शकता. त्यामुळे त्या खराब होण्याचीही भीती राहत नाही आणि वस्तू पाहिजे त्या वेळेला सहजपणे मिळतील. नेटच्या पिशव्यांमध्ये वस्तू व्यवस्थित ठेवल्याने फ्रिजच्या बकेटमध्ये त्या विखुरलेल्या म्हणजे अव्यवस्थित दिसणार नाहीत.