Tulsi Plant care Tips : तुळशीचं रोप अनेकांच्या घराबाहेर दिसते. सकारात्मक उर्जेचे प्रतीक असलेल्या तुळशीचे औषधी गुणधर्म देखील खूप आहेत. याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, जस्त आणि लोहाचे प्रमाण अधिक आहे. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. धार्मिक महत्त्वामुळे बरेच अंगबाहेर तुळस लावतात. मात्र योग्य काळजी न घेतल्यास ती कोमेजते किंवा सुकून जाते? यावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. वारंवार तुळस कोमेजून जात असेल तर तुम्ही खालील टिप्स फॉलो करत रोपाची काळजी घेऊ शकता. अशाने वर्षभर तुमची तुळस हिरवीगार आणि मजबूत ठेवू शकता.
योग्य आकाराची कुंडी निवडा
तुम्ही ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावणार ती कुंड फार लहान नसावी. पुष्कळ वेळा असे दिसून येते की, काही लोक केवळ पूजेच्या उद्देशाने तुळशीचे रोप एका लहान कुंडीत वाढवतात. अशाने तुळशीच्या रोपाला वाढण्यासाठी आवश्यक जागा मिळत नाही आणि त्याची वाढ खुंटते. तुळशीचे रोप लावण्यासाठी कमीत कमी १२ इंचाची कुंडी निवडावी.
रोपाची योग्य छाटणी करा
तुळशीच्या रोपाची योग्य वाढ होण्यासाठी आणि ते नेहमी भरीव दिसण्यासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने कटिंग करत राहा. तुळशीच्या रोपाला बिया किंवा मांजरी आल्यास लगेच कापून टाका. मांजरीमुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय अतिरिक्त लांब फांद्याही कटिंग करा.
चांगली माती वापरा
तुळशीच्या रोपासाठी योग्य माती वापरावी लागेल, नाहीतर रोप वारंवार सुकू शकते. काहीवेळा मातीत केमिकल असते. यामुळे तुळशीची लागवड करताना ५०% बागेची माती आणि २०% वाळू असावी जेणेकरून जास्तीचे पाणी बाहेर जाणार नाही. . याशिवाय गांडूळ खत आणि सेंद्रिय खत देखील जमिनीत मिसळावे यामुळे रोपाची योग्य व नैसर्गिक वाढ होईल.
माती कडक होऊ देऊ नका
तुळशीच्या रोपाची योग्य वाढ होण्यासाठी त्याची माती जास्त घट्ट व कडक होण्यापासून टाळावी. म्हणूनच माती मधोमध मळून घ्यावी जेणेकरून पाणी जमिनीत व्यवस्थित शोषले जाईल. याशिवाय खतही पाण्यात विरघळवून रोपाच्या मधोमध टाकावे.