Guava for Heart Health: हिवाळा सुरू होणार असेल की, भरपूर प्रमाणात पेरू बाजारात दिसू लागतात. हे एक छोटेसे फळ अगदी सामान्य दिसत असले तरी ते आरोग्यासाठी वरदान आहे. शिवाय हार्ट आणि कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी हे फळ अतिशय महत्त्वाचे आहेत. याबाबत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. वात्स्य यांनी पेरू खाण्याच्या फायद्यांविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.
जर तुमच्या दैनंदिन आहारात पोषक तत्वांनी समृद्ध फळे असतील तर अनेक आजार दूर राहतात. तज्ज्ञांच्या मते, पौढ व्यक्तीने दररोज १०० ते १५० ग्रॅम फळे नक्कीच खावीत. आता हिवाळा सुरू होणार आहे आणि या दिवसात पेरू चांगल्या प्रतीचे आणि भरपूर असतात. हे फळ तुम्हाला सामान्य वाटत असले तरी ते आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. वात्स्य यांनी पेरू खाण्याचे फायदे सांगितले आहेत. ते म्हणतात की, हे फळ आंब्याइतके लोकप्रिय नसले तरी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहे. तर मग पेरूच्या फायद्यांबाबत जाणून घेऊ…
पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी
तज्ज्ञ स्पष्ट करतात की, जर आपल्या देशात पेरू आंब्याइतकाच लोकप्रिय झाला तर कोणीही व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची तक्रार करणार नाही. पेरूमध्ये संत्र्यांपेक्षा चार पट जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यात लाइकोपीन आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
पेरू हृदयासाठी वरदान
तज्ज्ञ सांगतात की, पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी एक वरदान आहे. ते तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते आणि एथेरोस्क्लेरोसिस नावाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्यास प्रतिबंध करते. त्यात विरघळणारे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. पोटॅशियम रक्तदाब राखण्यासही मदत करते. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, जे तुमच्या हृदयाच्या पेशींना ऑक्सि़डेटिव्ह नुकसानापासून वाचवतात.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहींसाठी पेरू खाणे खूप फायदेशीर आहे. त्याचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, त्यात बायोएक्टिव्ह संयुगे असतात, जे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात.
आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तज्ज्ञ सांगतात की, पेरू तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला अॅसिडिटी किंवा पोटात अल्सरचा त्रास असेल तर पेरू खाणे फायदेशीर ठरू शकते.
कॅन्सरवरही गुणकारी
पेरूमध्ये लाइकोपीन आणि फ्लेव्होनॉइड्सदेखील असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात. हे डीएनए नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
